मराठवाड्यात अांदोलनाची धग कायम

मराठवाड्यात अांदोलनाची धग कायम
मराठवाड्यात अांदोलनाची धग कायम

औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग मराठवाड्यात बुधवारीही (ता. २५) कायम होती. कडकडीत बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मुंडन आदी माध्यमातून विविध ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली.  औरंगाबाद जिल्ह्यात पिंप्रीराजा, वडोदबाजार, बनोटी यासह इतर अनेक गावात मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. फुलंब्री तालुक्‍यातील टी पॉइंट येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही सुरूच होते.

खुल्ताबाद तालुक्‍यातील गल्लेबोरगाव येथील जनजीवन आज सुरळीत झाले. कन्नड तालुक्‍यातील देवगाव रंगारी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान विष प्राशन केल्याने बेशुद्धावस्थेत आढळलेल्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात बुधवारी (ता.२५) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

औराळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शासनाच्या आरक्षणविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला. सोयगाव तालुक्‍यातील बनोटी येथे फेरी काढून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला व शासनाचा निषेध करण्यात आला. बनोटी ते पाचोरा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वैजापूर येथील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

औरंगाबाद येथे क्रांती चौकात मुंडण आंदोलन करण्यात आले. मुंबई, पुणे, नगर तसेच लांब पल्याच्या बसेस अजूनही बंद आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळपासून इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली. तर औरंगाबाद शहरातील व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी ठिकठिकाणी आंदोलने झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com