agriculture news in marathi, the Marathwada in rabbi denger zone | Agrowon

पावसाअभावी मराठवाड्यात रब्बीवर संकटाचे ढग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : लवकरच बस्तान गुंडाळलेला मोसमी पाऊस व परतीच्या पावसाची अजूनही न झालेली कृपा यामुळे मराठवाड्यातील प्रस्तावित खरिपावरही संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे खरिपात मोठा फटका बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीच्या दृष्टिने ‘येरे...येरे... परतीच्या पावसा’ म्हणत आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : लवकरच बस्तान गुंडाळलेला मोसमी पाऊस व परतीच्या पावसाची अजूनही न झालेली कृपा यामुळे मराठवाड्यातील प्रस्तावित खरिपावरही संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे खरिपात मोठा फटका बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीच्या दृष्टिने ‘येरे...येरे... परतीच्या पावसा’ म्हणत आकाशाकडे लागल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या वतीने यंदा रब्बी पेरणीची तयारी करताना मराठवाड्यात सुमारे २० लाख ७० हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित पेरणीच्या तयारीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून नियोजनही करण्यात आले आहे. परंतु, केलेल्या नियोजनाची सारी भीस्त आता मराठवाड्यात येणाऱ्या परतीच्या पावसावर येऊन ठेपली आहे.

प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांपैकी १३ तालुक्‍यांत आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस पडला नाही. त्यामध्ये औरंगाबाद तीन, नांदेडमधील १, बीडमधील ५, लातूरमधील १, उस्मानाबादमधील ३ तालुक्‍यांचा समावेश आहे. शिवाय वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० ते ६० टक्‍के पाऊस पडलेल्या तालुक्‍यांची संख्यांही मोठी आहे. एकूण ४२१ मंडळांपैकी १२५ मंडळांत आजपर्यंत ५० टक्‍यांच्या आत पाऊस पडला आहे. तर १५४ मंडळांत सरासरीच्या तुलनेत ५० ते ७० टक्‍के पाऊस पडला आहे. ५० टक्‍क्‍यांच्या आत पाऊस पडलेल्या मंडळांत औरंगाबाद २८, जालना १५, परभणी ७, हिंगोली ४, नांदेड १०, बीड ३६, लातूर १० तर उस्मानाबाद १५ मंडळांचा समावेश आहे.

२० सप्टेबरपर्यंत मराठवाड्यातील केवळ ४९ मंडळांतच वार्षिक सरासरीच्या पुढे जाऊन पाऊस झाला होता. साधारणत: यातील काळी खोल, मध्यम व हलकी अशा जमिनीची प्रतवारी करता आता ५० टक्‍केही पाऊस न पडलेल्या जमिनीमध्ये परतीचा पाऊस सरासरी किमान ५० ते ६० मिलिमीटर पडला तरी रब्बीची पेरणी करणे जोखमीचे ठरणार आहे. अर्थात परतीचा पाऊस अपेक्षेनुरूप बरसला तर काळ्या खोल मध्यम व भारी जमिनीत रब्बीची आशा करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजपर्यंतचा पडलेला पाऊस पाहता यंदा रब्बीची वाट अवघड आहे. अत्यल्प पावसामुळे मुळात जमिनीत ओलावा कमी असल्याने परतीचा पाऊस अपेक्षेनुरूप बरसला तर खूप खोल काळी व मध्यम भारी जमिनीत रब्बीची आशा करता येईल. हलक्‍या जमिनीत मात्र, अशा परिस्थितीत रब्बीची पेरणी करणे जोखमीचे ठरू शकते.
- डॉ. सय्यद ईस्माईल,
विभाग प्रमुख, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वनामकृवि परभणी

 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...