agriculture news in marathi, Marathwada rain in the hand | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा हात आखडताच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाने हात आखडताच घेतला आहे. मराठवाड्यातील ४२१ मंडळातील पावसाच्या दिवसाची आकडेवारी पावसाच्या अनियमिततेचे दर्शन घडविते. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस येईल या आशेवर पेरणी वा लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अलीकडच्या तीन ते चार दिवसांत तर पावसाने मराठवाड्याच्या बहुतांश मंडळाकडे पाठच फिरविल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाने हात आखडताच घेतला आहे. मराठवाड्यातील ४२१ मंडळातील पावसाच्या दिवसाची आकडेवारी पावसाच्या अनियमिततेचे दर्शन घडविते. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस येईल या आशेवर पेरणी वा लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अलीकडच्या तीन ते चार दिवसांत तर पावसाने मराठवाड्याच्या बहुतांश मंडळाकडे पाठच फिरविल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील पावसाच्या दिवसांसदर्भात मंडळनिहाय १ ते २७ दिवसांतील पावसाच्या दिवसाचं रिपोर्टिंग पुन्हा एकदा पाऊस कृपाशील की अवकृपा दाखविणार हा प्रश्न आहे. महारेनवरील आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या बावणे मंडळात जूनच्या पहिल्या अठरा दिवसांत पावसाची हजेरीच लागली नव्हती. अलीकडच्या दहा दिवसांत जो काही पाऊस पडलाय किंवा ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडीबहुत सोय आहे, अशा बावणे पांगरी येथील शेतकऱ्यांची पिके टिकून आहेत. मात्र, जवळपास ७० टक्‍के शेतकऱ्यांची पावसावरील पिकं पुरेशा पावसाअभावी धोक्‍यात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील रामनगर, मिरखेडा, भोजपूरी, जळगाव, हडप सावरगाव, भीलपूरी आदी गावशिवारात पावसाची दडी कायम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे त्या भागातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. पावसाच्या महारेनवरील ४२१ मंडळांपैकी काही मंडळांतील पावसाच्या दिवसानुसार मराठवाड्यातील आठ मंडळांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊस समाधानकारक वा जास्त दिसत असला तरी प्रत्यक्षात २७ दिवसांत तो पडला किती दिवस यावर त्या त्या भागातील पिकांचं गणित अवलंबून आहे.

दहा दिवसांपूर्वी व अलीकडे चार ते पाच दिवस अगोदरच्या पावसाच्या भरवशावर पिके कशी बशी टिकून आहेत. पाऊस पुरेसा नसण्याचा ३० ते ४० टक्‍के फटका पेरलेल्या पिकांना बसला. सिंचनाची सोय असलेल्यांचीच पिके बरी आहेत.
- गणेश शिंदे, बावणे पांगरी, ता. बदनापूर जि. जालना.

ज्यांनी कपाशीची लागवड केली त्या जळू लागल्या. जनावरांसाठीही पाण्याची अबाळं होतेय. तयारी पूर्ण पण पावसाने खोडा घातल्यानं पेरण्या रखडल्यात.
- नारायण लहाने, शेतकरी भीलपूरी जि. जालना.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...