agriculture news in Marathi, Marathwada receives Heavy Rain | Agrowon

मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस 
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्‌बल 121 मंडळात शुक्रवारी (ता.17) 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाउस झाला. सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम होता. शुक्रवारी(ता.17) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यातील 421 मंडळात सरासरी 65.48 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गुरूवारी (ता.16) सायंकाळनंतर पहिल्यांदा काही नद्यांना पुर तर नदी नाल्यांना पाणी वाहल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळाले. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्‌बल 121 मंडळात शुक्रवारी (ता.17) 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाउस झाला. सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम होता. शुक्रवारी(ता.17) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यातील 421 मंडळात सरासरी 65.48 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गुरूवारी (ता.16) सायंकाळनंतर पहिल्यांदा काही नद्यांना पुर तर नदी नाल्यांना पाणी वाहल्याचे चित्र मराठवाड्यात पहायला मिळाले. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील 65 पैकी 54 मंडळात 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील 49 मंडळांपैकी 45 मंडळात, परभणी जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 24 मंडळात, हिंगोलीतील 30 पैकी 16, नांदेडमधील 80 पैकी 41 तर बीड जिल्ह्यातील 63 पैकी 9 मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद घेतल्या गेली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 421 मंडळांमध्ये सरासरी 65.48 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 104.41 मिलीमिटर, जालना जिल्ह्यात सरासरी 113.62 मिलीमिटर, परभणी जिल्ह्यात सरासरी 72.86 मिलिमीटर.

औरंगाबाद:जिल्ह्यातील गिरीजा नदीला आलेला पूर​

 
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 65.99 मिलीमिटर, नांदेड जिल्ह्यात सरासरी 71.86 मिलीमिटर, बीड जिल्ह्यात सरासरी 43.80 मिलीमिटर, लातूर जिल्ह्यात सरासरी 26.98 मिलीमिटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 24.95 मिलीमिटर पावसाची नोंद घेतल्या गेली. बुधवारी(ता.15) सायंकाळनंतर सुरू झालेला पाउस गुरूवारी(ता.16) सकाळपर्यंत नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 13 मंडळ वगळता हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा होता. गुरूवारी दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेडच्या तुलनेत उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी होता.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात आसना नदीला आलेला पूर...

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...