agriculture news in marathi, Marathwada region to get 1000 crores for water supply | Agrowon

मराठवाड्यात पाणीपुरवठा, स्वच्छता योजनांसाठी १००० कोटी
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद  : मराठवाड्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या योजना राबविण्यासाठी सुमारे १ हजार ४३४  कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मार्च २०१८ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

जलसंपदा विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.३) आयोजित विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड आदी उपस्थित होते.

औरंगाबाद  : मराठवाड्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या योजना राबविण्यासाठी सुमारे १ हजार ४३४  कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मार्च २०१८ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

जलसंपदा विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.३) आयोजित विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी ४६४ कोटी, जलस्वराज्य टप्पा-२ साठी १०९ कोटी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी ९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या निधीच्या माध्यमातून करण्यात येणारी सर्व कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले. 

मराठवाड्यात हागणदारीमुक्तीचे काम प्रगतीपथावर असून जालना जिल्हा आघाडीवर आहे. राज्यातील २९००० गांवे हागणदारीमुक्त झाली आहेत. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करावयाचा आहे. शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्रात २७७ कोटीचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी १२० कोटी मराठवाड्यात देण्यात येणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सागितले. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यात कामांना गती नाही अशा, जिल्ह्यातील कामांचा पुढील आठवड्यात विशेष आढावा घेण्यात येईल. सर्व कामे मार्च २०१८ पर्यंत कशा प्रकारे पूर्ण होतील यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर 
म्हणाले.
 

इतर बातम्या
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...