मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईही हातपाय पसरायला लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत चार जिल्ह्यांतील टंचाईची झळ बसणाऱ्या लोकसंख्येत २५ हजारांची भर पडली आहे. १८९ गाव, वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २११ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे.

गत आठवड्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांतील १७५ गाव व ३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत होती. ती संख्या आता १८६ गाव व ३ वाड्यांपर्यंत जाऊन पोचली आहे. टंचाईची ही स्थिती हळूहळू भीषणतेकडे वाटचाल करीत असून, बहुतांश भागात ऑक्‍टोबरमध्येच विहिरींनी तळ गाठला आहे. डिसेंबरनंतर मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट भीषण होण्याचे संकेत देत आहेत.

सध्या औरंगाबाद, जालना, बीड व नांदेड जिल्ह्यातील १८९ गाव, वाड्यांमधील ४ लाख ५२ हजार २९३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. गत आठवड्यात ही संख्या जवळपास ४ लाख २५ हजार होती. पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड या पाचही जिल्ह्यांत २२० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पावसातील प्रदीर्घ खंड व रुसलेल्या परतीच्या पावसाने पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, परतूर आदी तालुक्‍यांतील आणि भोकरदन शहर मिळून १८६ गावे व ३ वाड्यांत पाणीटंचाई आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, परतूर, नांदेडमधील मुखेड, बीडमधील परळी वैजनाथ आदी ठिकाणीही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांच्या संख्येत २४ सप्टेंबरअखेर २२ ची भर पडली. ही संख्या १६४ गाव-वाड्यांवर पोचली होती. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या वाढल्याने गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या १५५ टॅंकरची संख्याही २१ ने वाढून १७६ वर पोचली होती.

१५ आॅक्टोबरअखेरची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा     गाव-वाड्या  टॅंकर
औरंगाबाद १६३  १७१
जालना २३     ३७
नांदेड  २  
बीड 

विहिरींचे जिल्हानिहाय अधिग्रहण

औरंगाबाद  १०१
जालना   ५४
नांदेड ०२
बीड  २५
उस्मानाबाद  ३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com