शासकीय दूध संकलनात मराठवाड्याची राज्यात आघाडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : यंदाच्या आर्थिक वर्षाचा विचार करता मराठवाड्यातील एकूणच दूध संकलनात चढउतार पाहायला मिळाला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये प्रतिदिन ९ लाख १५ हजार लिटर दुधाचे संकलन झाले. त्यामध्ये खासगी डेअरींचा वाटा क्रमांक एकचा, तर सहकारी संघांच्या संकलनाचा वाटा क्रमांक दोनवर व शासकीय दूध संकलन क्रमांक तीनवर राहिला आहे. शासकीय संकलन केंद्राची मराठवाडास्तरीय दूध संकलनात पिछाडी दिसत असली, तरी राज्याच्या एकूण शासकीय दूध संकलनात मात्र मराठवाड्याची इतर विभागांच्या तुलनेत आघाडी आहे.

मराठवाड्यात डिसेंबर २०१७ मध्ये खासगी, सहकारी व शासकीय दुदूध संकलन केंद्रांकडून प्रतिदिन ९ लाख १५ हजार लिटर दुधाचे संकलन केले गेले. त्यामध्ये खासगी संकलन केंद्रांचा वाटा प्रतिदिन तब्बल ६ लाख २१ हजार लिटर, तर सहकारी संघांच्या दूध संकलनाचा वाटा २ लाख २३ हजार लिटर राहिला. सर्वात कमी ७१ हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन शासकीय दूध संकलन केंद्रांनी केले.

गतवर्षी एप्रिल ते मार्च २०१६-१७ या आर्थिक वर्षात मराठवाड्यात सरासरी प्रतिदिन ६ लाख १५ हजार लिटर दुधाचे संकलन झाले होते. यंदा २०१७-१८ या आर्थिक वर्षात मात्र नऊ महिन्यांतच दूध संकलनाची सरासरी प्रतिदिन ८ लाख १४ हजार लिटरवर पोचली आहे. गत आर्थिक वर्षात डिसेंबर २०१६ मध्ये प्रतिदिन ५ लाख ७२ हजार लिटर दूध संकलन झाले होते. त्यामध्ये खासगी दूध संकलनाचा वाटा प्रतिदीन ३ लाख ४५ हजार लिटर, सहकारी संघाचे दूध संकलन प्रतिदिन १ लाख ८५ हजार लिटर, तर शासकीय दूध संकलनाचा वाटा प्रतिदिन १ लाख ८५ हजार लिटर होता.

राज्यात प्रतिदिन जवळपास १ लाख ३० हजार लिटर दूध शासकीय दूध संकलन केंद्रावरून संकलित केले जाते. त्यामध्ये मराठवाड्याची आघाडी आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यावर विशेष लक्ष पुरवून दुष्काळी मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या योजना व प्रकल्पांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन जिल्हे शासकीय संकलनावर अवलंबून शासनाच्या अखत्यारीतील मराठवाड्यातील सहा प्रक्रिया केंद्रांपैकी औरंगाबादचे केंद्र वगळता पाच प्रक्रिया केंद्र सुरू आहेत. तर बावीस चिलिंग सेंटरपैकी जवळपास सोळा सेंटर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील दूध उत्पादक जवळपास पूर्णत: शासनाच्या संकलनावरच अवलंबून आहे. नांदेडमध्ये एक खासगी प्रकल्प वगळता शासनाच्या संकलनाशिवाय कोणताही आधार तूर्त उत्पादकांना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१७-१८ वर्षातील महिनानिहाय प्रतिदिन दूध संकलन (लिटरमध्ये) एप्रिल           ८ लाख ५७ हजार मे                ९ लाख १७ हजार जून              ७ लाख ९७ हजार जुलै              ८ लाख ९८ हजार ऑगस्ट.       ..९ लाख ३३ हजार सप्टेंबर          ९ लाख ४७ हजार ऑक्‍टोबर        ९ लाख ३४ हजार नोव्हेंबर          ९ लाख ५० हजार डिसेंबर           ९ लाख १५ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com