agriculture news in marathi, Marathwada on the threshold of drought | Agrowon

मराठवाड्यात दुष्काळस्थिती
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. परतीच्या पावसाची सर्वदूर मराठवाड्यात समाधानकारक स्थिती नाही. पावसाळा संपत आला तरी मराठवाड्यातील ७४५ लघुप्रकल्पांपैकी ५३९ प्रकल्पांत २५ टक्‍केही उपयुक्‍त पाणीसाठा नाही.

औरंगाबाद : यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. परतीच्या पावसाची सर्वदूर मराठवाड्यात समाधानकारक स्थिती नाही. पावसाळा संपत आला तरी मराठवाड्यातील ७४५ लघुप्रकल्पांपैकी ५३९ प्रकल्पांत २५ टक्‍केही उपयुक्‍त पाणीसाठा नाही.

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा असते. यंदा मात्र मराठवाड्यातील एकाही प्रकल्पात अपवाद वगळता अपेक्षित पाणीसाठा नाही. प्रत्येक आठवड्याला झालेल्या पाणीसाठ्यांमध्ये घट होत आहे. गत आठवड्यात मराठवाड्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमध्ये ३३.०२ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ५ सप्टेंबरअखेर ३२.८५ टक्‍क्‍यांवर आला आहे. मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये एक टक्‍क्‍यांपर्यंत घट नोंदली गेली आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात जवळपास ३ टक्‍के घट नोंदली गेली असून, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणीसाठ्यात जवळपास एक टक्‍का घट नोंदली गेली आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पाचा समावेश आहे. अकराही मोठ्या प्रकल्पात २०१७ मध्ये ७० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. तो यंदा केवळ ३७ टक्‍के आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात केवळ आठ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांत, बीड जिल्ह्यातील १६ पैकी दहा मध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. सहा प्रकल्पांत केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. २०१७ मध्ये मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ५ सप्टेेंबरला ५७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. तो यंदा त्याच तारखेला २३ टक्‍के आहे.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...