agriculture news in marathi, Marathwada, Vidharbha faces heat | Agrowon

मराठवाडा, विदर्भात चटका वाढला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 मार्च 2018

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी शहरांचा पारा चाळिशीपार गेला. परभणी येथे ४२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी शहरांचा पारा चाळिशीपार गेला. परभणी येथे ४२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हवेतील आर्द्रता कमी होत असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दुपारी उन्हाची तीव्रता वाढून तापमानाचा पारा चाळीसहून अधिक होत आहे. दुपारनंतर पुन्हा तापमानात हळूहळ घट होत आहे. सायंकाळी सहानंतर काही प्रमाणात हवेत किंचित गारवा तयार होत आहे, त्यामुळे रात्रीच्या तापमानात चांगलीच घट होत आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक येथे १६.० अंश सेल्सिअस, रत्नागिरी येथे २३.७ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

राज्यात दिवसाच्या तापमानात मोठी तफावत आढळून येत आहे. कोकणातील बहुतांशी भागांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या खाली असून, रत्नागिरी येथे ३२.० अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, सोलापूर भागात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. त्यामुळे या भागातील पारा चाळीस अंशांच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड येथील तापमान ३९ ते ४२ दरम्यान होते.

विदर्भात वर्धा येथे ४१.९ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला येथील तापमानही चाळीस अंशांच्या दरम्यान होते. कर्नाटकच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत असल्याने मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात हवामान किंचित ढगाळ राहिल. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई ३२.०, सांताक्रूझ ३२.७, अलिबाग ३४.०, रत्नागिरी ३२.०, डहाणू ३३.२, पुणे ३७.०, नगर ४०.२, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४१.०, नाशिक ३७.४, सांगली ३९.०, सातारा ३८.६, सोलापूर ४१.३, उस्मानाबाद ४०.१, औरंगाबाद ३९.०, परभणी ४२.०, नांदेड ४०.०, अकोला ४१.५, अमरावती ३९.८, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.२, नागपूर ४०.९, वर्धा ४१.९, यवतमाळ ४१.० 

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...