agriculture news in marathi, Marathwada water action plan will be made | Agrowon

मराठवाड्याच्या पाण्यासाठी कृती आराखडा करणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी नेमके काय करावे, यासाठी औरंगाबाद येथे रविवारी (ता. २५) बैठक पार पडली. चिंतनाअंती एकसंघपणे व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जवळपास महत्त्वाचे अकरा ठराव घेत त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी नेमके काय करावे, यासाठी औरंगाबाद येथे रविवारी (ता. २५) बैठक पार पडली. चिंतनाअंती एकसंघपणे व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जवळपास महत्त्वाचे अकरा ठराव घेत त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. 

मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचतर्फे या बैठकीसाठी पुढाकार घेण्यात आला होता. बैठकीचे संयोजक डॉ. संजय लाखे-पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची स्थिती स्पष्ट केली. आपत्ती प्रबंधन कायदा २००५ नुसार दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीसाठी वैधानिक यंत्रणा उभारणे, दुष्काळ, गारपीट, किडींचा प्रादुर्भाव, उष्ण व थंड हवामान यासाठी वैधानिक मदत विमा आणि कर्जासाठीचे आरबीआय मास्टर गाइडलाइन निर्देशाचे पालन करणे आणि त्यासाठी बॅंकविषयक एसएलबीसीची तातडीने बैठक बोलविण्याविषयीचा ठरावही घेण्यात आल्याचे डॉ. लाखे पाटील यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड म्हणाले, की दहा वर्षे लांबल्यानंतर आलेल्या जलआराखड्यातील त्रुटींवर तेराशे आक्षेप नोंदविलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यावर खर्च झालेले चाळीस कोटी पाण्यात गेले. यावर श्‍वेतपत्रिका जाहीर करावी. शंकरराव नागरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे राज्याच्या पाण्याची स्थिती स्पष्ट केली. प्रा. अवचरमल यांनी जलसंधारणाचे प्रेझेंटेशन केले. डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी गोदावरी लवादाचे पुनर्विलोकन व्हावे, नदी, खोरेनिहाय नियमावली करावी, बाहेरून येणाऱ्या पाण्याच्या मागणीबरोबरच मराठवाड्यातील धरणांमधील पाण्याचे नियोजन करणे, कालव्यांची देखभाल-दुरुस्ती करावी, पाणीवापर संस्थांच्या सक्षमीकरणावर भर द्यावा, पाटबंधारे महामंडळाचे नदी खोरे अभिकरणात रूपांतर व्हावे हा कृती आणि लोकचळवळ आराखडा मांडला. बन्सीलाल कुमावत, के. ई. हरिदास, कृष्णा पाटील डोणगावकर, सुमीत खांबेकर, प्रा. चंद्रकांत भराट, राजन क्षीरसागर, रेखा जैस्वाल, ए. एम. घुगे  यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि जलतज्ज्ञांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेंद्र दाते पाटील यांनी केले. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, विजयअण्णा बोराडे यांच्यासह विविध संस्था, संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...