agriculture news in marathi, Marathwadas kesar mango coming soon for consumer | Agrowon

केसर आंबा पाडाला आलाय...
संतोष मुंढे
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना आकर्षित करणारा मराठवाड्याचा केसर आंबा आठवडाभरापासून पाडाला आला आहे. तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तो बाजारात दाखल होईल, अशी माहिती केसर आंबा उत्पादकांनी दिली. यंदाही अनेक संकटांच्या मालिकांचा सामना मराठवाड्याच्या केसर आंब्याला करावा लागला. तसे, हेही वर्ष केसर आंबा उत्पादकांसाठी उत्पादनाबाबत पूर्ण समाधानाचे म्हणता येणार नाही.

औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना आकर्षित करणारा मराठवाड्याचा केसर आंबा आठवडाभरापासून पाडाला आला आहे. तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तो बाजारात दाखल होईल, अशी माहिती केसर आंबा उत्पादकांनी दिली. यंदाही अनेक संकटांच्या मालिकांचा सामना मराठवाड्याच्या केसर आंब्याला करावा लागला. तसे, हेही वर्ष केसर आंबा उत्पादकांसाठी उत्पादनाबाबत पूर्ण समाधानाचे म्हणता येणार नाही.

मराठवाड्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर विस्तारलेल्या केसर आंब्याला यंदा मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करावा लागला. तीन टप्प्यांत आलेल्या मोहरापैकी पहिल्या मोहरावर गारपीट व वाईट वातावरणाचा परिणाम झाला. त्यानंतरच्या दोन मोहरांवर आकाशात मिरविणाऱ्या ढगांमुळे भुरीचा प्रादुर्भाव झाला होता. तो निस्तारला जात नाही तोच फेब्रुवारीच्या मध्यान्हात गारपिटीने केसरवर आघात केला. या सर्व संकटानंतरही केसरचे किमान ३० ते ४० टक्‍के उत्पादन हाती येईल अशी आशा असतानाच पुन्हा वादळ, पाउस व वाढत्या तापमानाची संकट केसरवर आली. 

अलीकडे जवळपास ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात सनस्ट्रोकचा फटका केसरला चारही दिशांनी बसला. जवळपास दोन ते तीन टक्‍क्‍यांपर्यंत तापमानवाढीचे परिणाम केसरच्या नुकसानीत दिसून आल्याचे उत्पादक सांगतात. हंगामात केसरचे १० ते २० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. जवळपास आठवडाभरापासून मराठवाड्याचा केसर पाडला आला आहे. काही उत्पादकांनी कच्च्या आंब्यांची विक्रीही सुरू केली आहे. जागेवरून ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचे दर कच्च्या केसर आंब्याला मिळत असून, बाजारात आंब्याचे दर ७० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. 

आठवड्यापासून केसर पाडाला आलाय. जाग्यावरून कच्चे आंबे ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने देतोय. रमजान आणि अधिकचा महिना यंदा उत्पादन कमी झाले तरी दर मिळवून देण्यात फायदेशीर ठरतील. 
- मिठू चव्हाण, शेतकरी, सुलतानपूर, जि. औरंगाबाद.

केसरवर कमालीची संकट आली. पण त्यातूनही जो बचावला तो पाडाला आलायं. पुढच्या आठवड्यात त्याची चव चाखायला मिळेल अशी आशा आहे.
- शहादेव ढाकणे, शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...