agriculture news in marathi, market committee in trouble due to less paddy prodution, nagpur, maharashtra | Agrowon

नागपूर विभागातील धानपट्ट्यातील बाजार समित्या अडचणीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
नागपूर ः धानावर या वर्षी झालेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अत्यल्प पाऊस या कारणांमुळे जेमतेम क्षेत्रावर झालेली उन्हाळी धान लागवड या सर्व बाबींचा फटका धानपट्ट्यातील बाजार समित्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा तर दूरच, परंतु कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची उपलब्धता करण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
नागपूर ः धानावर या वर्षी झालेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अत्यल्प पाऊस या कारणांमुळे जेमतेम क्षेत्रावर झालेली उन्हाळी धान लागवड या सर्व बाबींचा फटका धानपट्ट्यातील बाजार समित्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा तर दूरच, परंतु कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची उपलब्धता करण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये धान (भात) लागवड होते. धानाचे नागपूर विभागात ७ लाख ३४ हजार ३०० हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात ७ लाख १४ हजार ४०० हेक्‍टर क्षेत्रावर धान लागवड झाली. २० हजार हेक्‍टर क्षेत्र रोवणीखाली आलेच नाही. त्यातच किडींचा प्रादुर्भाव धानावर झाल्याने त्याचा थेट उत्पादकतेला फटका बसला.
 
गेल्यावर्षीच्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानुसार २०.५० क्‍विंटल हेक्‍टरी उत्पादकता धानाची झाली होती. या वर्षी कीड-रोगाच्या परिणामी ही उत्पादकता हेक्‍टरी सात क्‍विंटलने कमी होत अवघी १३ क्‍विंटलवर आली. या साऱ्यांचा फटका बसल्याने बाजार समित्यांमधील धानाची आवकही मंदावली. 
 
भंडारा जिल्हयातील एका प्रसिद्ध बाजार समितीच्या सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामात ८ ते १० हजार पोत्यांची आवक होत होती. या वर्षी कीड-रोगामुळे उत्पादकता घटली आणि ही आवक १५०० ते २००० पोत्यांवर आली आहे. परिणामी बाजार समितीला सेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची सोय करण्याचे आव्हान या वर्षी पहिल्यांदाच निर्माण झाले आहे.
 
पगाराकरिता पैसा नसल्याने शेतकऱ्यांकरिता प्रस्तावित सुविधांकरिता पैशांची कशी सोय करावी, असाही प्रश्‍न आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वदूर ही परिस्थिती असल्याचे बाजार समित्यांशी निगडित सूत्रांकडून सांगण्यात आले. 

संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी उन्हाळी धान लागवड करतात. हे क्षेत्र सरासरी १६ हजार ७०० हेक्‍टर आहे. गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार १० हजार ६२ हेक्‍टर रोवणी झाली होती. यंदा ६ हजार हेक्‍टरने हे क्षेत्र कमी झाले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...