agriculture news in marathi, Market committees elections preparation start | Agrowon

बाजार समित्या निवडणुकांची तयारी सुरू
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून पारंपरिक निवडणूक पद्धतीमध्ये हाेणाऱ्या अामूलाग्र बदलाची नियमावली लवकरच जाहीर हाेणार अाहे. निवडणुकीच्या प्रणालीबाबत विविध २० हरकती आणि सूचना पणन संचालनालयाकडे प्राप्त झाल्या असून, या हरकती सूचना शासनाला पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी दिली.

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून पारंपरिक निवडणूक पद्धतीमध्ये हाेणाऱ्या अामूलाग्र बदलाची नियमावली लवकरच जाहीर हाेणार अाहे. निवडणुकीच्या प्रणालीबाबत विविध २० हरकती आणि सूचना पणन संचालनालयाकडे प्राप्त झाल्या असून, या हरकती सूचना शासनाला पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी दिली.

शेतकऱ्यांना मतदानाचा थेट अधिकार या निवडणुकांमध्ये मिळणार असून, गणाएेवजी सर्वच उमेदवारांना मतदानाचा अधिकार मिळावा, पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी सूचनादेखील आली आहे. मात्र ही निवडणूक नव्या धाेरणाप्रमाणेच हाेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठीची प्राथमिक तयारी म्हणून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घाेषित केले असून, मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला.

या निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांत माेठे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका मिनी विधानसभा म्हणून आेळखल्या जाणार आहे. या निवडणुकांसाठीच्या कायद्यातील बदलाला विधानसभेत मंजुरी मिळाली असून, विधान परिषदेची मान्यता मिळणे बाकी आहे. विधान परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर लवकरच या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

यासाठीची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान नव्याने हाेणाऱ्या निवडणूक प्रणालीबाबत पणन संचालनालयाने हरकती आणि सूचना मागविल्या हाेत्या. त्यानुसार २० हरकती सूचना आल्या असून, यामध्ये पारंपरिक पद्धतीनेच निवडणुका व्हाव्यात, निवडणुकांचा खर्च शासनाने करावा, गणनिहाय मतदान न हाेता सर्व उमेदवारांना मतदानाचा अधिकार मिळावा, अारक्षित जागांवर लॉटरी पद्धतीने आरक्षण काढण्यात येऊ नये आदी विविध हरकती घेण्यात आल्या आहेत. या सर्व हरकती शासनाकडे पाठविण्यात आल्याचे पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड यांनी सांगितले.

खर्च कमी करण्यासाठी गणांची निर्मिती
सर्वच उमेदवारांना मतदानाचा अधिकार दिल्यास निवडणुकीचा खर्च वाढणार आहे. हा खर्च कमी करत निवडणूक पद्धतीमध्ये सुसूत्रात आणण्यासाठी गणनिहाय मतदान घेण्यात येणार, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

 

इतर बातम्या
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
सरकारने शेती अन् शेतकरी उद्ध्वस्त केलालोहा, जि. नांदेड (प्रतिनिधी) ः साडेतीन वर्षे...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
टरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे...वाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत...
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे भवितव्य...सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांना वरदान...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...