agriculture news in marathi, Market Committees has started in Jalgaon District | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

जळगाव : कमी दर्जाचा शेतीमाल किंवा धान्य (नॉन एफएक्‍यू) हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याची मुभा शासनाच्या यंत्रणांनी दिल्याने जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी मुगाची खरेदी सुरू झाली आहे. परंतु चोपडा, जळगाव, अमळनेर येथील काही व्यापाऱ्यांनी आपल्याला नॉन एफएक्‍यू शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधी लेखी हमी किंवा पत्र शासनाने द्यावे, अशी भूमिका कायम ठेवली आहे.

जळगाव : कमी दर्जाचा शेतीमाल किंवा धान्य (नॉन एफएक्‍यू) हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याची मुभा शासनाच्या यंत्रणांनी दिल्याने जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी मुगाची खरेदी सुरू झाली आहे. परंतु चोपडा, जळगाव, अमळनेर येथील काही व्यापाऱ्यांनी आपल्याला नॉन एफएक्‍यू शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधी लेखी हमी किंवा पत्र शासनाने द्यावे, अशी भूमिका कायम ठेवली आहे.

लेखी हमीऐवजी संबंधित सर्व बाजार समित्यांमध्ये नॉन एफएक्‍यू माल कोणता हे निश्‍चित करण्यासाठी संबंधित तालुक्‍यातील सहायक निबंधक, तालुका कृषी अधिकारी व बाजार समितीमधील सचिव यांची त्रिसदस्यीय समिती केली जात आहे. या समितीने शेतीमालाची प्रतवारी निश्‍चित केली म्हणजे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करू शकतील, असे जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना सांगितले आहे. व्यापारी व प्रशासन यांची संयुक्त बैठक यासंबंधी नुकतीच झाली. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी परिमल साळुंखे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शशिकांत बियाणी, अशोक राठी, मांगीलाल जैन आदी उपस्थित होते.  

त्रिसदस्यीय समितीचा विषय व्यापाऱ्यांनी स्वीकारला. परंतु काही तक्रारी नको, कुणी पोलिसात तक्रार केली, तर अडचण नको म्हणून कायदेशीर संरक्षण हवे आहे. हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधीची लेखी हमी आपल्याला हवी आहे, अशी मागणी केली. ती मिळालेली नसली तरी जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (ता. ६) खरेदी सुरू झाली. मुगाची आवक मध्यंतरी झाली होती. त्याचे लिलाव पार पाडल्याचे सांगण्यात आले. यावल, चोपडा येथे मात्र फारसे व्यवहार झाले नाहीत. जामनेरातही किरकोळ व्यवहार झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता शेतीमाल विक्री होणार आहे.

मुगाला पाच हजारांचा दर
नॉन एफएक्‍यू मुगाला पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. उडदालाही ५५०० रुपयांपेक्षा अधिक दर आहे. दरांचा घोळ सुरू असतानाच शासनाने हमीभावात खरेदी सुरू करावी. जिल्हाभरात २० खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...