पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ

पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. तर मागणीच्या मानाने आवकेत घट झाल्याने घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून मटार आणि गाजर प्रत्येकी सुमारे १० ट्रक, राजस्थानमधून मटार १० ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी तर भुईमूग सुमारे ६० गोणी, आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणी तर गुजरातहून गवारीची दोन टेम्पो आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गोणी, टॉमेटोे सुमारे ४ हजार क्रेट, कोबी ८ तर फ्लॉवर सुमारे १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, पावटा ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, तर कांदा नवीन सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर,  गुजरात येथून बटाट्याची ५५ ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा :  ५०-६०, बटाटा : गुजरात  ७०-१५०, लसूण : १५०-३००, आले : सातारी ५५०-६००, आले : भेंडी : ४००-५००, गवार : ६०० ते ८००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ३५०-४५०, पांढरी २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१२०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १००-१३०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ५००-५००, कोहळा : २००-२५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, भुईमूग शेंग : ६००-६५०, मटार : परराज्य ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका  कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या  आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच आहेत. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ८००-१५००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-८००.

फळ बाजार फळ बाजारात रविवारी (ता. १७) मोसंबीची जुन्या आणि नव्या बहाराची सुमारे ६० टन, संत्री ४५ टन, डाळिंब सुमारे २०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार ५०० गोणी, चिक्कू ३ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू २५० क्रेट, कलिंगड ४० टेम्पो, खरबुज २५ टेम्पो, विविध द्राक्षांची सुमारे ३५ टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ४००-९००, अननस (डझन) : ७०-२७०,  मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १२०-३५०, (४ डझन ) : ३०-१४०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सफरचंद : किन्नोर (२५ किलो) २२००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) १०००-१५००, द्राक्षे : जंम्बो (१० किलो) ५००-८००, सुपर सोनाका (१५ किलो) ७००-१०००, शरद सिडलेस  (१५ किलो) ६००-९००.

फूल बाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ६० ते १००, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, कागडा : १५०-२००, मोगरा : २००-४००, आॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ६-२०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ३०-७०, लिली बंडल : २-३, जर्बेरा : ५-२०, कार्नेशियन : ४०-६०.

मासळी गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची मासळी ५०० किलो, नदीची सुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

दरम्यान, मासळीला मागणी वाढली असून, त्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व मासळीचे दर स्थिर आहेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत हलवा, सुरमई, रावस, पापलेटच्या दरात ५ टक्के वाढ झाली असल्याचेही परदेशी यांना सांगितले. तसेच उन्हाळ्यामुळे इंग्लिश अंड्यांची मागणी घटल्याने शेकड्याच्या दरात ४० रुपये घट झाली आहे. चिकनच्या दरात मागच्या आठवड्याच्या तुलनेत प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली, तर मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १५००, मध्यम : १२००, लहान ९००-९५०, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान ६५०-७००, मोठा ८००, घोळ : ७००, करली : ३२०, करंदी  (सोललेली) : ३६०-४००, भिंग : ४००, पाला : ६५०-१०००, वाम : पिवळी ५५०-८००,  काळी : २८०, ओले बोंबील : १२०-१६०. कोळंबी : लहान ३२०, मोठी ५२०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : १८०- २००, मांदेली : १२०,  राणीमासा : १८०-२००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ६००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २८०, नगली : लहान ३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २००-२४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १४०, मोठा २००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली :  १४०-१५०. 

नदीची मासळी : नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, मांगुर : १५०, खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : ३६०, वाम : ६००.  मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०. अंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३५५ डझन : ५४ प्रतिनग: ४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com