agriculture news in marathi, Market of Silk Treasury will be set up in Jalna | Agrowon

जालन्यात साकारणार रेशीम कोषाची बाजारपेठ
संतोष मुंढे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : अपारंपरिक राज्यात रेशीम कोष उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार दिवसांपूर्वी शासन व प्रशासनाकडून प्रस्ताव व निधी मान्यतेचा प्रश्न मार्गी लागल्याने आता जालन्यात कर्नाटकमधील रामनगरमपेक्षाही अधिक सुसज्ज अशी रेशीम कोष बाजारपेठ लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवासा मिळणार आहे.

औरंगाबाद : अपारंपरिक राज्यात रेशीम कोष उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यात बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार दिवसांपूर्वी शासन व प्रशासनाकडून प्रस्ताव व निधी मान्यतेचा प्रश्न मार्गी लागल्याने आता जालन्यात कर्नाटकमधील रामनगरमपेक्षाही अधिक सुसज्ज अशी रेशीम कोष बाजारपेठ लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवासा मिळणार आहे.

राज्यात दर्जेदार रेशीम कोषाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी उत्पादक शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरमच्या बाजारात आपले रेशीम विक्रीसाठी घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निसर्गाच्या लहरीपणाचा विविध पिकांमध्ये शेतकऱ्यांना येत असताना रेशीमने मात्र या लहरीपणातही शेतकऱ्यांना समर्थ साथ देण्याचे काम केले.

राज्यातील रेशीम कोष उत्पादनात मराठवाड्याने आघाडी घेतल्याने या भागात रेशीम कोषाची बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनासमोर होता. या प्रस्तावाला २४ ऑक्‍टोबरला शासनाने मान्यता दिली आहे. शासनासह नियोजन विभागाच्या तसेच उच्चाधिकार सचिव समितीच्या बैठकीतही मान्यता देण्यात आल्याने आता जालन्यात रेशीम कोषाची अत्याधुनिक बाजारपेठ अस्तित्वात येण्याच्या कामाला साधारणत: महिनाभरानंतर प्रत्यक्षात सुरवात होणे अपेक्षित आहे.

जालना शहरातील जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रीकर निरीक्षक कार्यालय व आकाशवाणीसमोरील पाच एकरांत ही बाजारपेठ उभी राहणार असल्याची माहिती सहायक संचालक (रेशीम) दिलीप हाके यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास सव्वासहा कोटी खर्चून ही बाजारपेठ रेशीम विभागाच्या बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने बांधली जाणार आहे. कर्नाटकातील रामनगरमच्या बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या जालन्याच्या रेशीम कोष बाजारात येता कामा नये याची विशेष खबरदारी या बाजारपेठ निर्मितीत घेण्यात येणार असल्याचे श्री. हाके म्हणाले.

या बाजारपेठेमुळे महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांचा त्रास वाचणार असून, बाजारपेठेतील सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहितीही श्री. हाके यांनी दिली.

ऑटोमॅटिक रिलिंग युनिटचे कामही युद्धपातळीवर
जालना जिल्ह्यातच प्रतिदिवस एक कोटी टन क्षमता ठेवून असलेले ऑटोमॅटिक रेलिंग युनिटचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास १ कोटी ६० लाख रुपये खर्चून त्यासाठी लागणाऱ्या मशिन आणण्यात आल्या असून, येत्या तीन महिन्यांत हे ऑटोमॅटिक रेलिंग युनिटही सुरू होणे अपेक्षित आहे.

एक ते ३० नोव्हेंबरदरम्यान महारेशीम अभियान राबविले जात आहे. पुढील वर्षी दहा हजार एकरांवर रेशीम उत्पादनाचा संकल्प आहे. आजघडीला उत्पादकांसमोर बाजारपेठेचा प्रश्न आहे. नव्याने रेशीम उत्पादनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर किमान बाजारपेठेचा प्रश्न राहू नये असे आमचे प्रयत्न आहेत.  
- दिलीप हाके, सहायक संचालक रेशीम, औरंगाबाद विभाग.

इतर अॅग्रोमनी
गहू, हरभऱ्याच्या भावात घटया सप्ताहात कापसाचे व साखरेचे भाव वाढले इतर...
द्राक्ष बागेतील भुरीनियंत्रणाकडे...येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची...सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने...
ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे...पुणे ः किरकोळ व संस्थात्मक मागणीचा भक्कम आधार आणि...
साखर उत्पादन ३९ लाख टनांवर नवी दिल्ली  ः देशात ऊस गाळप हंगामाने वेग...
हरभऱ्यात नरमाईचा कलयंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक...
गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींचा...या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढले,...
ब्रॉयलर्सच्या दरात सुधारणा,...पुणे : रविवारी (ता. २६) बेंचमार्क नाशिक विभागात...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
कापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी...
हरभरा, मसुरीवर अायात शुल्क लागू होणारमुंबई ः पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के अायात शुल्क...
वाढत्या मागणीमुळे अंड्यांच्या दरात वाढ नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम...
दीड महिन्यात तेरा लाख टन साखर उत्पादन नवी दिल्ली ः देशातील बहुतांश साखर कारखान्यांनी...
मार्चअखेर पाच लाख टन कडधान्य वितरित...कें द्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित...
वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सचा बाजार... सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांना थंडीमुळे जोरदार...
शेती, अन्नपुरवठा साखळीत ५००० कोटींची...स्वित्झर्लंडस्थित पायोनियरिंग व्हेंचर्स फंडने...
सोयाबीनमधील मंदीची कारणेजगात सलग तिसऱ्या वर्षी सोयाबीनचे उच्चांकी उत्पादन...
चांगल्या सवयीचे गुलाम व्हामित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही...