agriculture news in marathi, Marketing department Watch on Market Committees | Agrowon

बाजार समित्यांवर पणनची नजर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील बाजार समित्यांवरील पणन संचालनालयाचा असणारा वचक कमी झाला असून आता पणन संचालनालय बाजार समित्यांवर नजर ठेवणार आहे. बेशिस्त बाजार समित्यांना शिस्त लावण्यासाठी तालुका, जिल्हा आणि विभागीय पातळ्यांवर स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे पणन संचालक डॉ. आनंद जाेददंड यांनी ‘ॲग्राेवनला‘ सांगितले.

पुणे : राज्यातील बाजार समित्यांवरील पणन संचालनालयाचा असणारा वचक कमी झाला असून आता पणन संचालनालय बाजार समित्यांवर नजर ठेवणार आहे. बेशिस्त बाजार समित्यांना शिस्त लावण्यासाठी तालुका, जिल्हा आणि विभागीय पातळ्यांवर स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे पणन संचालक डॉ. आनंद जाेददंड यांनी ‘ॲग्राेवनला‘ सांगितले.

राज्यातील ३०६ बाजार समित्यांद्वारे हाेणाऱ्या काेट्यवधी रुपयांच्या शेतमाल खरेदी विक्रीवर पणन संचालनालयाचे नियंत्रत्रण असते. मात्र पणन संचालनालयाचे गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समित्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे अनेक बाजार समित्यांच्या कामकाजात अनियमितता वाढली आहे.

बाजार समित्यांवर तालुका निबंधक, जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण असते. हि दाेन्हीही पदे सहकार विभागाकडील असून, यांच्यावर विविध सहकारी संस्थांच्या कामकाजाचे नियंत्रण असल्याने यांच्याकडून बाजार समित्या दुर्लक्षित राहत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे बाजार समित्यांच्या कामकाजावरील नियंत्रण ठेवण्यासाठी पणन संचालकांना जिल्हा उपनिबंधक आणि तालुका निबंधकांवर अवलंबून रहावे लागत आहे.

मात्र आता बाजार समित्यांच्या कामकाजाला शिस्त लावण्यासाठी तालुका पातळीवर सहाय्यक संचालक पणन, जिल्हा पातळीवर उपसंचालक पणन आणि विभागीय पातळीवर सहसंचालकांची नियुक्ती केली जाणार अाहे. या नियुक्त्यांनंतर या अधिकाऱ्यांवर केवळ बाजार समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.

पणन विभाग सक्षमीकरणाचाच भाग म्हणून प्रत्येक बाजार समितीवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांचीदेखील सचिवपदी निवड करण्याचा शासनाच्या विचाराधिन असून, त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने अहवाल शासनाला सादर केला आहे.

इतर बातम्या
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...