agriculture news in Marathi, marketing federation director says, mistakes in agriculture products purchasing find out and action will be taken within month, Maharashtra | Agrowon

शेतमाल खरेदीतील चुका शोधून एक महिन्यात कारवाई : पणन संचालक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत चुका करणाऱ्या बाजार समित्यांचा अभ्यास करून एक महिन्यात कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिला आहे.  

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एका शिष्टमंडळाने डॉ. जोगदंड यांची भेट घेतली. ‘‘शेतमाल दर्जेदार (नॉन एफएक्यू) नसल्याचे सांगून बाजार समित्यांमधील कर्मचारी, आडते आणि व्यापारी एकत्रितपणे शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे या खरेदीच्या पद्धतीची चौकशी झालीच पाहिजे,’’ असा आग्रह श्री. पाटील यांनी धरला. 

पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत चुका करणाऱ्या बाजार समित्यांचा अभ्यास करून एक महिन्यात कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी दिला आहे.  

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एका शिष्टमंडळाने डॉ. जोगदंड यांची भेट घेतली. ‘‘शेतमाल दर्जेदार (नॉन एफएक्यू) नसल्याचे सांगून बाजार समित्यांमधील कर्मचारी, आडते आणि व्यापारी एकत्रितपणे शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे या खरेदीच्या पद्धतीची चौकशी झालीच पाहिजे,’’ असा आग्रह श्री. पाटील यांनी धरला. 

‘‘बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्याचा माल नॉन एफएक्यू असल्याचे दाखले छापून घेतले आहेत. सचिवाच्या स्वाक्षऱ्यानिशी हे दाखले व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. दर्जेदार शेतमाल मातीमोल भावाने विकत घेण्याची बाजार समितीमधील ही मिलीभगत थांबवा; अन्यथा आम्हाला पणन संचालनालयाला आंदोलनाच्या मार्गाने जाब विचारावा लागेल,’’ असा इशारा श्री. पाटील यांनी दिला. 

शेतकऱ्यांची लूट होत असताना पणन आणि सहकार विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. बाजार समितीत हमीभावानुसार प्रतिक्विंटल सोयाबीनला ३०५० रुपये आणि मुगाला ५५७५ रुपयांच्या वर भाव दिला पाहिजे. मात्र, नॉन एफएक्यू माल दाखवून सोयबीन २२०० रुपये, मूग ३००० रुपयांनी खरेदी केला जातो. तसेच, उडीद ५४०० रुपयांऐवजी ३३०० रुपये व मक्याची खरेदी १४२५ रुपयांऐवजी १२०० रुपयाने करीत बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लक्षावधी रुपयांची हानी होत आहे, असेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. 

या बैठकीनंतर श्री. आपेट म्हणाले, की बाजार समित्यांच्या भ्रष्ट कामकाजाला सहकार खात्याचे तालुका निबंधक, सहायक निबंधक पाठिशी घालतात. या प्रकरणांबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन पणन संचालकांनी दिले आहे. आश्वासन पाळले नाही, तर शेतकरी आता पणन संचालकांचे कार्यालय फोडून समस्येकडे लक्ष वेधतील.

परिपत्रक सापडण्याच्या आधी मी निवृत्त होईल
बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून २०११ मध्ये पणन संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करा, अशी मागणी शिष्टमंडळाने पणन संचालकांकडे केली. ‘‘ते परिपत्रक तुम्हीच मला आणून द्या. कारण आमच्या कार्यालयात ते सापडण्यापूर्वी मी निवृत्त होईल. खात्यात कारवाई करण्याचा प्रयत्न मी केला असता माझ्याच मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न झाला,’’ अशा शब्दांत पणन संचालकांनी आपलीच कैफियत शेतकऱ्यांसमोर मांडली.  

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...