agriculture news in Marathi, Marketing Federation now launched mobile vehicle market model, Maharashtra | Agrowon

‘पणन’कडून आता मोबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे ः शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. या मॉडेलसाठी महानगरपालिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी (ता. १५) बैठकीचे आयाेजन करण्यात आले आहे.

पुणे ः शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. या मॉडेलसाठी महानगरपालिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी (ता. १५) बैठकीचे आयाेजन करण्यात आले आहे.

शहरांमध्ये ग्राहक आणि शेतकऱ्यांना रास्त दरात शेतमालाची खरेदी विक्री करता यावी, आणि या माध्यमातून शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी शहरांच्या विविध भागांत माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे.

यामध्ये कंटेनरप्रमाणे वातानुकूलित माेबाईल व्हॅन विकसित करण्यात येणार असून, यामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. १० ते १२ शेतकरी एका व्हॅनद्वारे आपला शेतमाल विक्री करू शकणार आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे व्यवस्थापन पणन मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून, दरराेज शहराती विविध आणि विशिष्ट ठिकाणी ही वाहने उभी करण्यात येणार आहे. या वाहनांमधील जागा शेतकऱ्यांना विनामूल्य वापरासाठी देण्यात येणार असून, दरराेज पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

दरम्यान, या याेजनेसाठी धाेरणात्मक निर्णय घ्यावा, असे पत्र माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले हाेते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग, कृषी विभागाचे प्रधान सचिव, एमएसीपीचे प्रकल्प संचालक, पणन संचालक, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या संचालकांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...