agriculture news in marathi, Marketing federation purchase cotton is only for CCI | Agrowon

पणन महासंघाची कापूस खरेदी ‘सीसीआय’साठीच
विनोद इंगोले
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या वतीने यावर्षीदेखील भारतीय कापूस महामंडळ(सीसीआय)ची नोडल एजन्सी म्हणूनच कापसाची खरेदी केली जाणार आहे. महासंघाने स्वतंत्रपणे कापूस खरेदीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महासंघाकडून ‘सीसीआय’साठीच खरेदी होणार आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या वतीने यावर्षीदेखील भारतीय कापूस महामंडळ(सीसीआय)ची नोडल एजन्सी म्हणूनच कापसाची खरेदी केली जाणार आहे. महासंघाने स्वतंत्रपणे कापूस खरेदीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महासंघाकडून ‘सीसीआय’साठीच खरेदी होणार आहे.

कापसाचा एकाधिकार सहा वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर शेतकऱ्यांना कापूस कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरही बाजार कोसळू नये याकरीता पणन महासंघकडून बाजारात कापसाची खरेदी केली जाते. २०१५-१६ या वर्षात कापूस पणन महासंघाने अडीच लाख क्‍विंटल कापसाची खरेदी केली होती.

२०१६-१७ या वर्षातही ‘सीसीआय’करीता दोन टक्‍के कमिशनवर पणन महासंघाकडून कापूस खरेदी करण्यात आली. परंतु खुल्या बाजारात ४१६० रुपये या हमीभावापेक्षा ५५०० ते ६००० रुपये प्रती क्‍विंटल असा अधिक दर शेतकऱ्यांना मिळाला.

परिणामी पणन महासंघाची अपेक्षित खरेदी झाली नाही. याउलट खासगी व्यापाऱ्यांनी १२२ लाख २७ हजार ९८० क्‍विंटलपेक्षा अधिकची खरेदी केली. गेल्या वर्षी सीसीआयची ५८ तर पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र होती.

यावर्षीदेखील नोडल एजन्सी
कापूस पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता. परंतु त्याला मान्यता मिळाली नाही. परिणामी यावर्षीदेखील ‘सीसीआय’करीता कमिशन तत्त्वावरच पणन महासंघाची खरेदी होईल. त्या संदर्भाने ‘सीसीआय’सोबत पणन महासंघाच्या प्रशासनिक बैठका पार पडल्या आहेत.

 

शासनाला पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे यावर्षीदेखील सीसीआयकरिताच कमिशन तत्त्वावर खरेदी होणार आहे. त्या संदर्भाने लवकरच घोषणा होईल.
- उषाताई शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळ

 

 

इतर अॅग्रो विशेष
प्रश्न जादा साखरेचादेशात पुढच्या वर्षी साखर उत्पादनात वाढ अपेक्षित...
दक्षिण ब्राझीलमधील साखर उत्पादनात घट नवी दिल्ली ः ब्राझील देश साखर उत्पादनात जगात...
दुष्काळग्रस्त लातूर जिल्हा ५० टक्के `... लातूर ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्त...
नांदेड जिल्ह्यात २५० गावांत शेतकऱ्यांचा...नांदेड : पुणे जिल्ह्यातील कानगाव (ता. दौंड)...
बैलांच्या सजावटीला बचत गटाचा साजनशिराबाद (जि. जळगाव) येथील दुर्गाबाई शांताराम नाथ...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास...जिरायती शेतीसाठी वाण; २०१९ च्या हंगामात होईल...
‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण,...स्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता,...
अंदमानलगत कमी दाबाचे क्षेत्र; पावसाची...पुणे : अंदमान निकाेबारलगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र...
विलीनीकरण नको, पुनर्रचना कराएकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या अघोऱ्या ...
प्रकल्प पूर्णत्वाचा मार्ग खडतरविदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व पश्चिम...
पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जामुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...
ज्वारी, करडई, सूर्यफूल, कापूस पीक सल्लारब्बी ज्वारी : खोडकिडा : (पोंगेमर) लक्षणे...
चारा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई कधी?मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चारा...
यंदाचा हंगाम गेलाच, पुढच्याची चिंताऔरंगाबाद : मुख्य नगदी पीक कपाशीवर यंदा शेंदरी...
बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...
कीटकनाशक विभागात मुख्य गुणवत्ता...गुणनियंत्रण विभागाची दैना : भाग ४ पुणे :...
मृद्संधारणात १०० कोटींच्या कामांत घोटाळापुणे : कृषी खात्यातील अलिबाबाची गुहा म्हणून ओळख...
पाचट आच्छादन करा, सुपीकता वाढवाएक हेक्‍टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट...
दुष्काळात द्राक्ष पट्ट्यात फुलवले सीताफळमांजर्डे (जि. सांगली) येथील भानुदास मोहिते अनेक...