agriculture news in marathi, Marketing federation will purchase sugar says Minister Subhas Deshmukh | Agrowon

पणन महासंघाकडून साखर खरेदी
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे : बाजारात साखरेचे दर घसरल्यामुळे साखर उद्योग संकटात सापडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कारखानदार व उद्योजकांकडून केली जात होती. सरकारनेच साखर खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवून मंजुरी घेतल्यानंतर पणन महासंघाकडून साखर खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पुणे : बाजारात साखरेचे दर घसरल्यामुळे साखर उद्योग संकटात सापडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कारखानदार व उद्योजकांकडून केली जात होती. सरकारनेच साखर खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवून मंजुरी घेतल्यानंतर पणन महासंघाकडून साखर खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

नवीन शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, ‘‘सध्या साखरेचे दर घसरत आहेत, त्यामुळे साखर उद्योग आणि कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे राज्य सरकारने साखर खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यावर गांभीर्याने चर्चा करून तूर आणि सोयाबीन खरेदीच्या धर्तीवर साखरदेखील खरेदी करण्याचे विचाराधीन आहे. ३ हजार रुपये ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल खरेदी केल्यास एकूण साखर उत्पादनाच्या तुलनेत २० ते २५ टक्के साखर सरकार खरेदी करू शकते. १० ते १५ टन साखर पणन महासंघाकडून खरेदी केली जाऊ शकते.’’

पणन महासंघाद्वारे साखर खरेदी करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाईल. मंजुरीनंतर साखर खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यामुळे साखर उद्योजक व कारखानदारांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...