agriculture news in Marathi, marketing is a middle point of smart project, Maharashtra | Agrowon

स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘मार्केटिंग’ : आयुक्त सुहास दिवसे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे कसे हे सांगण्याची गरज नाही. आता विकायचे कसे आणि कुठे यासाठी कृषी विभाग पुढाकार घेईल. त्यासाठी स्मार्ट प्रकल्प राबविला जात आहे, स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू ‘मार्केटिंग’च असेल, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. 

पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे कसे हे सांगण्याची गरज नाही. आता विकायचे कसे आणि कुठे यासाठी कृषी विभाग पुढाकार घेईल. त्यासाठी स्मार्ट प्रकल्प राबविला जात आहे, स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू ‘मार्केटिंग’च असेल, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. 

जागतिक बॅंकेच्या मदतीने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकल्पाला आकार देण्यासाठी आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट प्रकल्पाला गती दिली जात आहे. याशिवाय निवृत्त मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांचाही सहभाग यात आहे. 

राज्यातील दहा हजार गावांचा समावेश स्मार्टमध्ये केला जाणार आहे. त्यासाठी २ हजार ११८ कोटी रुपये इतका निधी गुंतविण्यात येणार असून, त्यापैकी १ हजार ४८३ कोटी रुपये जागतिक बँक देणार आहे. 

श्री. दिवसे म्हणाले की, “विविध पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे जादा उत्पादकता उद्दिष्ठ असले तरी ते  मुख्य उद्दिष्ट नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांना मार्केंटिंग क्षेत्रात बळकट करण्याची अतिशय गरज आहे. स्मार्ट प्रकल्पामध्ये पणन आणि कृषी अशा दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे मार्केटिंगच्या मुद्द्यावर काम करणार आहेत.”

कृषी मूल्य साखळीला (व्हॅल्यू चेन) सुगी पश्चात क्षेत्रांमध्ये मूल्यवर्धनासाठी प्रोत्साहन देणे हा स्मार्टचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. आयुक्त म्हणाले की, “प्रकल्पाच्या संकल्पनेची बांधणी सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणत्या बाबी कशा पद्धतीने केल्या जाणार हे अजून निश्चित झालेले नाही. त्यावर अभ्यास आणि बैठका सुरू आहेत. मात्र, या उपक्रमाची सर्व दिशा लवकरच स्पष्ट होर्ईल.”

दरम्यान, स्मार्ट प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास (एमएसीपी) प्रकल्पाप्रमाणे स्वतंत्र आयएएस अधिकारी देण्याचे राज्य शासनाने टाळले आहे. त्याऐवजी कृषी आयुक्तांनाच ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालकपद देण्यात आले आहे. कृषी आयुक्तांनी मात्र अतिरिक्त प्रकल्प संचालकपदी दशरथ तांबाळे यांची नियुक्ती केली आहे. ते कोल्हापूर विभागाते कृषी सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी एमएसीपीच्या बांधणीत श्री. तांबाळे व प्रदीप पाटील यांनी चांगली कामगिरी केली. अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून आयुक्तांच्या वतीने बहुतेक कामकाज श्री. तांबाळे यांच्याकडून पाहिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 कृषी उपसंचालक प्रदीप पाटील आणि तंत्र अधिकारी अजय पाटील यांनादेखील स्मार्ट प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथशेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंतपुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : राज्यातील उन्हाचा चटका पुन्हा वाढू...
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन्...गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा...