agriculture news in Marathi, Marketing will intervene in cotton market even after March? | Agrowon

मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात हस्तक्षेप?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या गेल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचा उद्देश ठेवत पणन महासंघाने मार्चनंतरही केंद्र सुरू ठेवण्याचा विचार चालविला आहे. खासगी बाजारात कापसाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी राज्य कापूस पणन महासंघापेक्षा व्यापाऱ्यांनाच कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पणन महासंघाकडे कापसाची आवक जवळपास बंद झाली आहे, अशा परिस्थितीतदेखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी पणन महासंघाने आपली केंद्र सुरू ठेवली आहेत. 

यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या गेल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचा उद्देश ठेवत पणन महासंघाने मार्चनंतरही केंद्र सुरू ठेवण्याचा विचार चालविला आहे. खासगी बाजारात कापसाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी राज्य कापूस पणन महासंघापेक्षा व्यापाऱ्यांनाच कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पणन महासंघाकडे कापसाची आवक जवळपास बंद झाली आहे, अशा परिस्थितीतदेखील केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी पणन महासंघाने आपली केंद्र सुरू ठेवली आहेत. 

बाजार हमीभावाच्या खाली येऊ नये याकरिता पणनकडून बाजारात हस्तक्षेप केला जातो. सध्या व्यापाऱ्यांकडून कापसाला ५७५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर ५,४५० रुपये हमीभाव आहे. प्रतिक्‍विंटल २५० रुपये हमीभावाच्या तुलनेत अधिक मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस देत आहेत. त्यातच चुकारेदेखील नगदी असल्याने शेतकऱ्यांचे प्राधान्य सध्यातरी व्यापाऱ्यांनाच आहे. पणन महासंघाने यवतमाळ येथे पहिले केंद्र सुरू केले; परंतु या केंद्रावर एक बोंडही कापसाची खरेदी झाली नाही.

पणनची केंद्र सुरूच
जिल्ह्यात पणन महासंघाने पाच केंद्र सुरू केली आहेत. त्यामधील चार केंद्रांवर सात हजार ३२४ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदी ११ लाख ५० हजार क्‍विंटलवर पोचली. दरवर्षी साधारणतः ३१ मार्चपर्यंत केंद्र सुरू असतात. त्यानंतर आवक नसल्याने केंद्र बंद केली जात होती. यंदा शेतकऱ्यांचे हित पाहता केंद्र मार्चनंतरही सुरू राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...