agriculture news in marathi, marriage in fodder camp,nagar, maharashtra | Agrowon

जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘रेशीमगाठ’
सुर्यकांत नेटके
रविवार, 21 एप्रिल 2019

दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हैराण आहेत. त्यात लग्नकार्याचा मोठा खर्च आहे. त्यामुळे आम्ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न छावणीत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे समाधान मिळाले. शेतकऱ्यांनी अशा दुष्काळी परिस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
- विठ्ठलराव वाडगे, छावणीचालक, मांडवगण, ता. श्रीगोंदा.

नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी नसताना जनावरे कशी जगवायची, हा प्रश्‍न सध्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला पडला आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी (ता. १८) मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील जनावरांच्या छावणीत गरीब कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह करीत वेगळा आदर्श निर्माण केला गेला आहे. या उपक्रमासाठी छावणीचालकांनी पुढाकार घेतला तर मंडप व जेवणाचा खर्च छावणीकडून केला गेला. 

सीना नदी आणि पुणे जिल्ह्यामधील कुकडीच्या पाण्याचे वरदान लाभलेला श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भाग यंदा दुष्काळाने होरपळत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारा मांडवगण हा भागदेखील या स्थितीला अपवाद नाही. माणसे कशीही जगतील; मात्र मुकी जनावरे जगविण्यासाठी धडपड सुरू असणाऱ्या तेथील लोकांचे जिणे मुश्‍कील झाले आहे. अशा वातावरणात तेथे वृद्धेश्‍वर मल्टिस्टेट सोसायटीचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे यांच्या पुढाकाराने जनावरांची छावणी सुरू झाली. येथे ८१३ जनावरे आहेत. 

छावणीत जाधव परिवाराचीही जनावरे आहेत. मांडवगण येथील किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पूजा यांचा विवाह जुळला. मुलाला वडील नाहीत, तर मुलीला आई नाही. घरची आर्थिक स्थिती एकदम बेताची आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याच्या हेतूने वाडगे यांनी छावणीतच लग्न सोहळा उरकण्याचा आग्रह धरला. मंडप आणि जेवणावळीचा खर्च छावणीमार्फत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी तयार झाली.

मुलगी औरंगाबाद जिल्ह्यामधील असली तरी लग्न मांडवगणला आणले आणि शेतकरी, कष्टकरी कामगारांसह पशुधनाच्या उपस्थितीत अनिल आणि पूजा यांची रेशीमगाठ बांधली गेली, असे महेश तोगे यांनी सांगितले. या छावणीचालकांचे १ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे नियोजन असून शेतकऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

इतर बातम्या
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...