हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'

हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'

नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14 जवानांना 'शौर्यचक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यातील एका जवानाला मरणोत्तर 'कीर्तीचक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्नानित करण्यात येणार आहे.  स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या (ता.15) लष्करातील 14 जवानांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआयपीएफ) 5 जवानांना शौर्यचक्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शौर्यचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या जवानांमध्ये मेजर आदित्य कुमार आणि हुतात्मा औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे. 

या जवानांना मिळणार शौर्यचक्र :

औरंगजेब (मरणोत्तर), मेजर आदित्य कुमार, लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा, मेजर पवन गौतम, कॅप्टन जयेश राजेश वर्मा, कॅप्टन कनिंदर पालसिंह, नायब सुभेदार अनिल कुमार दहिया, नायब सुभेदार विजय कुमार यादव, हवालदार कुल बहादूर थापा, हवालदार जावेद अहमद भट्ट, गनर रंजितसिंह, रायफलमन निलेशभाई, रायफलमन जयप्रकाश ओरांव तर शिपाई ब्रह्मपाल सिंह यांना मरणोत्तर कीर्तीचक्र या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com