agriculture news in marathi, marutrao ghule prize distribution ceremony, nagar, maharashtra | Agrowon

शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी मेगा फूड पार्कची उभारणी : हणमंतराव गायकवाड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता करणे, रुग्णांना अॅम्ब्युलन्सची सेवा पुरवणे अशी कामे हाती घेतली. त्याचबरोबर शेतीप्रश्न सोडविण्याचाही निर्णय घेतला. शेतीवर होणारा खर्च वाढला आहे. त्या तुलनेत शेतीमालाला दर मिळत नाही. म्हणून शेतीमालावर आधारित असलेल्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मेगा फूड पार्क या प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.

भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता करणे, रुग्णांना अॅम्ब्युलन्सची सेवा पुरवणे अशी कामे हाती घेतली. त्याचबरोबर शेतीप्रश्न सोडविण्याचाही निर्णय घेतला. शेतीवर होणारा खर्च वाढला आहे. त्या तुलनेत शेतीमालाला दर मिळत नाही. म्हणून शेतीमालावर आधारित असलेल्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मेगा फूड पार्क या प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.

भेंडा (ता. नेवासा) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ८८ व्या जयंती निमित्त ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्यावतीने लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांना माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते शनिवारी (ता. १५) प्रदान करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, माजी खासदार तुकाराम गडाख, डॉ. क्षितीज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, अशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, दिलीपराव लांडे, भाऊसाहेब पटारे, बानाभाऊ सुकाळकर, अरुण लांडे पाटील, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी या वेळी उपस्थित होते.

श्री. गायकवाड म्हणाले, की शेतीआधारित विविध घटकांना चालना देण्याचा भारत विकास ग्रुफमार्फत (बीव्हीजी) निर्णय घेतला. सुरवातीला रसायन अवशेषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात चांगल्या प्रकारे रसायन अवशेषमुक्त  शेतीमाल उत्पादित होणार आहे. याशिवाय पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यावर मात करण्यासाठी जैविक कीडनाशकांची निर्मिती केली जात आहे. तसेच माती व पाणी परीक्षणाची सुविधा शेतकऱ्यांना नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या वेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी प्रास्तविक केले. मोहन देशमुख यांनी यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...