...हे तर सामूहिक हत्याकांड : किशोर तिवारी
विनोद इंगोले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात फवारणीदरम्यान विषबाधा होत ४० पेक्षा अधिक मृत्यू आणि दोन हजारांवर बाधित झाले आहेत. हे एक प्रकारचे हत्याकांड असून, या हत्याकांडात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कृषी धोरण राबविणारे अधिकारी, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रे, आरोग्य सेवा देणारे अधिकारी सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात फवारणीदरम्यान विषबाधा होत ४० पेक्षा अधिक मृत्यू आणि दोन हजारांवर बाधित झाले आहेत. हे एक प्रकारचे हत्याकांड असून, या हत्याकांडात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कृषी धोरण राबविणारे अधिकारी, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रे, आरोग्य सेवा देणारे अधिकारी सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

पत्रकार संघाच्या कार्यालयात सोमवारी (ता. ९) तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्याने, झाडे मोठी झाल्यामुळे, दुपारी प्रचंड ऊन व उकाड्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा दावा पूर्णपणे खोडून या हत्याकांडाला चुकीचे धोरण व शासकीय व्यवस्थाच जबाबदार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकादेशीर बियाणे विकली गेली. त्या वेळी कृषी खात्याचा स्थानिक व विभागीय गुणनियंत्रण विभाग कोठे होता, असा प्रश्‍न त्यांनी केला. आतासुद्धा एकाही कंपनी किंवा विक्रेत्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. यामागे कंपन्या आणि विक्रेत्यांकडून हप्तेखोरी करणारे अधिकारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कृषी विभागाचा शेतकऱ्यांशी संवाद तुटला
यात सर्वांत मोठे अपयश कृषी खात्याचे आहे. शेतकऱ्यांशी कृषी विभागाचा संवादच राहिला नाही. गावातील चार-दोन लोकांना हाय-हॅलो करण्यापुरतेच कर्मचारी गावात जातात. शेतकऱ्यांच्या बैठका घेत त्यांना कृषी सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, असे काम होतच नसल्याचेही श्री. तिवारी यांनी म्हटले आहे.

नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारा
विषारी शेतीमुळे अनेकांचे बळी गेले. फवारलेल्या अन्नघटकांचा आहारात समावेश होतो. त्यातूनही भविष्यात अनेकांना दुर्धर आजार होण्याची भीती आहे. त्यामुळे सिक्‍कीमप्रमाणे राज्यात नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...