कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गुरुवारी (ता. १२) दुपारपर्यंत मुसळधार पाऊस सुुुरू होता. यामुळे बहुतांशी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. दुपारपर्यंत पंचगंगा नदीवरील ३७ बंधारे पाण्याखाली गेले होते. चंदगड तालुक्‍यातील झांबरे धरणातून विसर्ग वाढविल्याने चंदगड, तिलारी, गोवा मार्ग ठप्प झाला आहे. अनेक स्थानिक मार्ग पाण्याखाली गेल्याने सात गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अणुस्कुरा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणांच्या पाण्यात झपाट्याने वाढ सुरू होती.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड हा एक बंधारे पाण्याखाली आहेत, कासारी नदीवरील बाजार भोगाव, वालोली, यवलूज, ठाणे आळणे व पुनाळ तिरपण हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील शेणवडे व कळे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपणी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोकरे हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील अडकूर व गवशी हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये याप्रमाणे ः गगनबावडा- ९१, हातकणंगले ५.८८, शिरोळ ४.५७, पन्हाळा ३२.७१, शाहूवाडी ५७.६६, राधानगरी ४७.००, करवीर १९.१८, कागल २१.५७, गडहिंग्लज २३.२८, भुदरगड ५५.८०, आजरा ५०.०० व चंदगड ३७.१६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com