agriculture news in marathi, Mathadis state law will not be changed | Agrowon

माथाडी कामगार संघटनांपुढे सरकार झुकले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

बोर्डांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला मागे
मुंबई : राज्यातल्या माथाडी कामगारांच्या संघटनांपुढे सरकार झुकले असून माथाडी बोर्डांच्या एकत्रीकरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. यासंदर्भात कामगार मंत्री संभाजी पाटील यांच्या दालनात बुधवारी (ता. ३१) माथाडी कामगार नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगार मंत्री संभाजी पाटील यांनी राज्यातील माथाडी बोर्डाच्या एकत्रीकरणाबाबत आलेली अधिसूचना मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले.

बोर्डांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला मागे
मुंबई : राज्यातल्या माथाडी कामगारांच्या संघटनांपुढे सरकार झुकले असून माथाडी बोर्डांच्या एकत्रीकरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. यासंदर्भात कामगार मंत्री संभाजी पाटील यांच्या दालनात बुधवारी (ता. ३१) माथाडी कामगार नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगार मंत्री संभाजी पाटील यांनी राज्यातील माथाडी बोर्डाच्या एकत्रीकरणाबाबत आलेली अधिसूचना मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले.

राज्यातल्या विविध ३६ माथाडी बोर्डाचा कारभार सुसूत्र व्हावा, यासाठी सरकारने गेल्या महिन्यात या बोर्डाच्या एकत्रीकरणाबाबत अभ्यास गट नियुक्त करत असल्याची अधिसूचना जरी करून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात केली होती. मात्र अनेक माथाडी बोर्डाच्या कामगार संघटनांनी सरकारच्या या भूमिकेचा विरोध केला होता. यासंदर्भात ३० जानेवारीला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी बंद ही केला होता. 

माथाडी कामगारांच्या संरक्षण व कल्याणासाठी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ हा कामगार कायदा राज्यात सध्या लागू आहे. माथाडी कामगारांच्या संरक्षण व कल्याणासाठी तसेच माथाडी कायद्याची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ३६ माथाडी मंडळे कार्यरत आहेत.  

 पण सरकारने नियुक्त अभ्यास समितीत माथाडी प्रतिनिधी घेतला नाही. या अभ्यास गटाचे अध्यक्ष कामगार आयुक्तांना देण्यात आले होते. कायद्याच्या मूळ रचनेत बदल करून कामगारांचे नुकसान करण्याच्या राज्य सरकारच्या मालकधार्जिण्या धोरणाचा माथाडी कामगार संघटनांनी विरोध केला. माथाडी मंडळात कोणताही प्रस्ताव व तक्रारी आल्यास त्यासंदर्भात मंडळाकडे लेखी निवेदने सादर करण्याची अट या अधिसूचनेत घालण्यात आली होती. हे सरकारचे मालक धार्जिणे धोरण असल्याचे आम्ही बैठकीत कामगार मंत्र्यांना सांगितले. त्यानुसार कामगार मंत्र्यांनी माथाडी संघटनांचे म्हणणे ऐकून घेऊन एकत्रीकरणाच्या संदर्भातील अधिसूचना मागे घेत असल्याचे जाहीर केल्याचे माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही बाबींचा अभ्यास न करता कामगार मंत्र्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात माथाडी बोर्डाच्या कारभाराची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांच्या बोर्डाचे एकत्रीकरण करणेच अवघड आणि अव्यवहार्य असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...