Agriculture news in marathi, Mauli's Palkhi ceremony was held in Solapur district | Agrowon

माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नातेपुते, जि. सोलापूर (प्रतिनिधी)  :
देव गुज सांगे पंढरीसी यारे। प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें।। कायावाचामनें दृढ धरा जीवीं।
 सर्व मी चालवी भार त्यांचा।।

नातेपुते, जि. सोलापूर (प्रतिनिधी)  :
देव गुज सांगे पंढरीसी यारे। प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें।। कायावाचामनें दृढ धरा जीवीं।
 सर्व मी चालवी भार त्यांचा।।
असे विठ्ठल-वारकरी प्रेमांचे आर्त प्रगट करणारे दिंड्यामधून गायले जाणारे अभंग... डौलाने फडकणाऱ्या पताका... डोळ्यांचे पारणे फेडणारी रथावरील आकर्षक फुलांची सजावट... माउली माउली नामांचा अखंड जयघोष व समीप आलेल्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवत श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (ता. १७) सातारा जिल्ह्यातून धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

सातारा जिल्ह्यातून हजारो वैष्णवांसह सकाळी १०.२० वाजता माउलींच्या नगाऱ्यांच्या पाठोपाठ माउलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. दिंड्यापाठोपाठ १०.५० वाजता माउलींच्या रथांचे आगमन झाले. या वेळी जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरीजवळ स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, दीपाली भोसले, जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी माउलींचे पूजन करून स्वागत केले. या वेळी पालखी सोहळ्यांचे मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त, चोपदार राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख मिलिंद मोहिते, सहायक जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे, आमदार हणुमंतराव डोळस, भाजप नेते उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, खासदार संजय जाधव, फलटणचे तहसीलदार विजय पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.
 

टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. अत्यंत शिस्तबद्धतेने वारकरी आपापल्या दिंडीत भजन करत पुढे मार्गस्थ होत होते. एका वेगळ्याच उत्साहाने वातावरण भारून गेले होते. दुपारचे भोजन उरकून पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे.

दहा जिल्ह्यांतील कलापथकांकडून प्रबोधन
स्वागत समारंभानंतर आरोग्य खात्याने या वर्षी सुरू केलेल्या मोटार सायकलवरील आरोग्य दूत या
मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात
आले. सकाळी ८.३० पासून माउलींच्या आगमनापर्यंत राज्यांतील १० जिल्ह्यांतील ११ कलापथकांनी पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी हा संदेश घेऊन मान्यवरांच्या समोर आपली प्रबोधनात्मक कला सादर केली. या पथकांतील ७० कलाकारांनी शिक्षणांचे महत्त्व सांगून मुलीची भावी जोडीदाराबद्दलची अपेक्षा पथनाट्याद्वारे सादर केली. दुपारचे जेवण धर्मपुरी बंगला येथे झाले. या वेळी आळंदी देवस्थानने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना महाप्रसाद दिला.

इतर बातम्या
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...