agriculture news in Marathi, MCAR cancels decision of PhD, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठे भरती मंडळाची पीएचडी मुद्द्यावर कोलांटउडी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

पुणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी वैध नसल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाने कोलांटउडी घेतली आहे. मंडळाने आधीचे घेतलेले वादग्रस्त निर्णय रद्द करून पीएचडीची समकक्षता मान्य केली आहे.  

पुणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी वैध नसल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाने कोलांटउडी घेतली आहे. मंडळाने आधीचे घेतलेले वादग्रस्त निर्णय रद्द करून पीएचडीची समकक्षता मान्य केली आहे.  

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कक्षेत काम करणाऱ्या मंडळाने यापूर्वी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे काही विद्यापीठांमधील अधिष्ठातापदाच्या नेमणुका रद्द कराव्या लागल्या होत्या. मंडळाच्या अध्यक्षांचा संदर्भ देऊन विद्यापीठांनी या नियुक्त्या रद्द केल्या. मात्र आम्हाला यातले काहीच माहिती नाही, अशी संशयास्पद भूमिका मंडळाने घेतली होती.
 
“मंडळाचे कामकाज पीएचडी मुद्दावर वादग्रस्त ठरले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये पदोन्नत्या देताना मुक्त विद्यापीठाची पीएचडी चालणार नाही अशी उरफाटी भूमिका मंडळाने घेतली. विद्यापीठ अनुदान मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेपर्यंत देशभर या पीएचडीला मान्यता होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन आपली भूमिका बदलली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुक्त विद्यापीठाच्या पीएचडीबाबत आधी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणतीही हरकत घेतलेली नव्हती. त्यामुळे या पीएचडीला इतर विद्यापीठाशी समकक्ष मानावे, अशी मागणी काही प्राध्यापकांची होती. मंडळाने मात्र समकक्षतेला नकार दिला. त्यामुळेच प्रकरण उच्च न्यायालयात गेले. विशेष म्हणजे मंडळाने न्यायालयात देखील नकारघंटा वाजविली होती.

मुक्त विद्यापीठांच्या पदवीला मान्य करणारे निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मंडळाची भूमिका विसंगत असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात मांडला गेला. न्यायालयाने ही विसंगती मान्य केली. “या विसंगतीवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. विसंगती दूर न केल्यास दोन लाखांचा दंड करण्याचा इशारा न्यायालयाने दिला. त्यामुळे मंडळाने घाईघाईने बैठक घेतली आणि पीएचडीचा मुद्दा मान्य केला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

माजी कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या या बैठकीला प्रा. एम. सी. वारष्णेय, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. अशोक ढवण, डॉ. एस. डी. सावंत तसेच कृषी परिषदेचे महासंचालक महेंद्र वारभूवन उपस्थित होते. मात्र, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी व डॉ. जी. व्यंकटेश्वरलू अनुपस्थित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
दरम्यान, न्यायालयाने मंडळाचे निर्णय व त्याबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पीएचडी वादाच्या याचिका निकाली काढल्या आहेत. त्यामुळे मंडळाला दिलासा मिळाला आहे. 

फक्त विद्यापीठ कायद्यातील विषयाला मान्यता
मुक्त विद्यापीठाच्या पीएचडीला मान्यता असली, तरी संबंधित पीएचडीचा विषय कृषी विद्यापीठे कायद्याच्या परिनियमातील यादीतील हवा. यादीबाहेरील पीएचडीचा विषय मान्य करता येणार नाही, असादेखील निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...