agriculture news in marathi, MCR's Report to start Government Agricultural College | Agrowon

शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत एमसीआरचा अहवाल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत तोडगा निघू न शकल्याने अद्यापही बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. या महाविद्यालयाबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गेल्याच महिन्यात राज्याच्या कृषी व पदूम विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल देत मोताळा तालुक्‍यातील तळणी येथील जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे पत्रात स्पष्ट दिसून येत आहे.

अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेबाबत तोडगा निघू न शकल्याने अद्यापही बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. या महाविद्यालयाबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गेल्याच महिन्यात राज्याच्या कृषी व पदूम विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल देत मोताळा तालुक्‍यातील तळणी येथील जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे पत्रात स्पष्ट दिसून येत आहे.

कृषी परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले की, बुलडाणा जिल्ह्यात तळणी (ता. मोताळा) येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत प्रस्ताव विद्यापीठाच्या व परिषदेच्या शिफारशीसह यापूर्वीच शासनाला सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव हा विद्यापीठाकडून परिषदेला मिळाला होता.

प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने तळणी येथे हे महाविद्यालय सुरू करण्याचा ठराव पारीत करून कृषी परिषदेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. या मंजुरीपूर्वी विद्यापीठाच्या तांत्रिक समितीने तळणी येथे जाऊन सर्व सोयीसुविधा व जागेची पाहणी केल्यानंतर अहवाल बनविला होता. या प्रस्तावाला कृषी परिषदेने फेब्रुवारी २०१६ मध्ये बैठकीत मान्यताही दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविद्यालयाच्या मान्यतेबाबत घोषणासुद्धा झालेली असून तेव्हापासून हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलेला असताना विद्यापीठाने सप्टेंबर २०१६ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात शासन अनुदानित घटक कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत अभिप्राय दिला. त्यात तळणी येथे नवीन महाविद्यालयासाठी सर्व सोयी निर्माण कराव्या लागतील, सिंचनाची सोय उपलब्ध नसून ती नव्याने निर्माण करावी लागेल, बुलडाणा मुख्यालयी नवीन महाविद्यालयासाठी जमीन उपलब्ध असून इतर सोयीसुविधा व साधनसामग्री, शासकीय इमारत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना राहण्यासाठी आवश्‍यक सोयी उपलब्ध आहेत, असे विद्यापीठाने कळविले होते. नेमके हेच मुद्दे परिषदेला चुकीचे वाटत आहेत. हे मुद्दे खोडून काढताना परिषदेने म्हटले की, विद्यापीठाने तळणी येथील महाविद्यालयाबाबत पूर्वीच प्रस्ताव सादर केला होता.

कृषी महाविद्यालयासाठी या गावकऱ्यांनी १५० एकर जमीन विना मोबदला देण्याचे मान्य केले, तळणी येथे कायमस्वरूपी सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. शिवाय मोताळा हा अतिमागास तालुका असून मोताळा, नांदुरा, मलकापूर, तळणी येथील शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाचा फायदा मिळणार आहे.

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...