agriculture news in marathi, Measures to provide relief to the farmers: Guardian Minister Shinde | Agrowon

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना ः पालकमंत्री शिंदे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

नगर : टंचाईसदृश परिस्थिती राज्य शासनाने गांभीर्याने घेतली आहे. जाहीर केल्याने विविध सवलती दुष्काळी तालुक्यासाठी लागू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणार आहोत, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी बुधवारी ता. २४ पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी केली. आमदार विजय औटी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

नगर : टंचाईसदृश परिस्थिती राज्य शासनाने गांभीर्याने घेतली आहे. जाहीर केल्याने विविध सवलती दुष्काळी तालुक्यासाठी लागू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणार आहोत, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी बुधवारी ता. २४ पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील टंचाईसदृश परिस्थितीची पाहणी केली. आमदार विजय औटी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पारनेर तालुक्यातील काळकुप, जामगाव या गावांना भेटी दिल्या. तेथील कोरड्या पडलेल्या विहिरी, तसेच पिकांची पाहणी या वेळी त्यांनी केली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालय, पारनेर येथे टंचाई आढावा बैठक घेतली.

शिंदे म्हणाले, ‘ज्या गावांची टॅंकरची मागणी असेल, त्या गावांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा, आगामी काळात पाणी आणि चारा यांचे नियोजन करून त्याची उपलब्धता कशी होईल हे पाहा. मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करा. सध्याच्या परिस्थितीत एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या, वनतळी, सीसीटी, रोपवाटिकानिर्मिती, चारानियोजन, पशुधनाची काळजी आदी बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाणी जपून वापरा, नावीन्यपूर्ण योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, टँकर मागणी संदर्भातील प्रस्ताव तपासून तात्काळ मंजूर केला जाईल. बोंड अळीचे २ कोटी ७६ लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. हुमणी अळीच्या प्रादुर्भावासंदर्भात लवकरच राज्य शासन कार्यवाही करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टंचाईसदृश स्थितीच्या अनुषंगाने शासनाने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ या भागातील नागरिकांना मिळेल.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...