agriculture news in marathi, meeting about sugarcane rate, mumbai, maharashtra | Agrowon

ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक निर्णयाविनाच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत
असताना, कायदेशीर लढाई लढत असताना साखर कारखानदार कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करतात हे माहिती असल्यामुळे कायदेशीर बाबी, तांत्रिक मुद्दे अशा सर्व बाबींच्या अभ्यासाचा शेतकऱ्यांना ऊस दर मिळवून देण्यासाठी उपयोग करणार आहे.
- प्रल्हाद इंगोले, सदस्य, ऊस दर नियंत्रण समिती.

मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७) कोणत्याही निर्णयाविनाच संपली. बैठकीत ऊसदरावरून संघटनेचे प्रतिनिधी आणि कारखानदार यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. ऊसदर नियामक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिली बैठक मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

मागील हंगामातील ऊस दर निश्चित करणे व येत्या गाळप हंगामाचा ऊस दर ठरवणे याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणे अपेक्षित होते. पण याबाबत कोणताही ठोस निर्णय बैठकीत झाला नाही. बैठकीत प्रामुख्याने ऊसदराचा मुद्दाही चर्चेला आला. साखरेचे दर पडल्याने ‘एफआरपी’ देताना अडचणी येत असल्याचे कारखानदारांचे प्रतिनिधींनी बैठकीत स्पष्ट केले. त्यावर साखरेचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते योग्य नाही, अशी भूमिका संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडली. यावरुन एका खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले प्रतिनिधी आणि संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात खडाजंगी झाली.

राज्यात शुगरकेन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनाला आणून दिले. उसाचा दर हंगामाआधी निश्चित करणे अपेक्षित असताना २०१६-१७ च्या हंगामात दुष्काळामुळे बंद असलेल्या साखर कारखान्यांनी २०१७-१८ च्या हंगामातील उसाला अंतिम दर दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ७०-३० च्या फॉर्म्यूल्यानुसार शेतकऱ्यांना २०१६-१७ च्या हंगामातील काही कारखानदारांकडून सुमारे ९० कोटी मिळालेले नाहीत. गेल्या हंगामाच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. आगामी हंगामाबाबत नेमके कोणते धोरण असणार आहे, अशी विचारणा संघटनेच्या प्रतिनिधींनी केल्याचे सांगण्यात आले.

काही कारखानदार रिकव्हरीचा अहवाल वस्तुनिष्ठ देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उतारा कमी दाखवून नुकसान केले जाते, याकडेही लक्ष वेधण्यात आले. ऊसदर नियंत्रण समितीवर २ सहकारी साखर कारखाने, २ खासगी साखर कारखाने व ५ शेतकरी प्रतिनिधी सदस्य म्हणून आहेत. राज्याचे मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असून महाराष्ट्राचे साखर आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...