agriculture news in marathi, meeting for alliance betwwen swabhimani and bahujan maha sangh, akola, maharashtra | Agrowon

भारिप बहुजन महासंघासोबत ‘स्वाभिमानी’ची आघाडीसाठी चाचपणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

अकोला  ः राज्यात अागामी निवडणुकीत स्वाभिमानी पक्ष ताकदीने मैदानात उतरण्याच्या हालचाली करीत अाहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता.२९) भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश अांबेडकर यांची रविकांत तुपकर यांनी अकोल्यात भेट घेतली. या दोघांमध्ये  बराचवेळ चर्चा झाली असून, यापुढील बैठक मुंबईत येत्या ६ अाॅक्टोबरला होणार असल्याचे समजते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी श्री. अांबेडकर यांची भेट घेऊन अाघाडीबाबत चर्चा करणार अाहेत.

अकोला  ः राज्यात अागामी निवडणुकीत स्वाभिमानी पक्ष ताकदीने मैदानात उतरण्याच्या हालचाली करीत अाहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता.२९) भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश अांबेडकर यांची रविकांत तुपकर यांनी अकोल्यात भेट घेतली. या दोघांमध्ये  बराचवेळ चर्चा झाली असून, यापुढील बैठक मुंबईत येत्या ६ अाॅक्टोबरला होणार असल्याचे समजते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी श्री. अांबेडकर यांची भेट घेऊन अाघाडीबाबत चर्चा करणार अाहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या वेळी भाजपसोबत होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून संघटना सत्तेपासून दूर झाली. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या ‘फडात’ उतरण्यासाठी विविध पक्षांसोबत अाघाडीबाबत ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांच्या बैठका होत अाहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अाघाडीच्या नेत्यांसोबतसुद्धा बैठक झाली. अद्याप मात्र याअनुषंगाने ठोस काही झालेले दिसत नाही. हे लक्षात घेता अाता ‘स्वाभिमानी’ने भारिप बहुजन महासंघासोबत चर्चा सुरू केली अाहे.  

भारिप- बहुजन महासंघासोबत अाघाडी झाल्यास राज्यात काही मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ला चांगला फायदा होऊ शकतो. प्रामुख्याने बुलडाणा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीत अाहे. त्यांनीही जिल्हाभर दौरे सुरू करून वातावरण निर्मिती सुरू केली. या जिल्ह्यातील काही भागात भारिप-बहुजन महासंघाची चांगली ताकद अाहे. अांबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग अाहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अाघाडी न झाल्यास ‘भारिप-बमसं’ची मदत मिळवण्याची ‘स्वाभिमानी’ने धडपड सुरू केली अाहे.

येत्या २ अाॅक्टोबरपासून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे विदर्भ दौऱ्यावर अाहेत. कापूस-सोयाबीन परिषदांमधून ते विदर्भात वातावरण तापविणार हे निश्चित मानले जाते. शनिवारी अकोल्यात झालेल्या बैठकीत प्राथमिक स्वरुपातील चर्चा झाली. या अाघाडीबाबत ६ अाॅक्टोबरच्या बैठकीतून काही निष्पन्न होऊ शकेल.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...