agriculture news in marathi, meeting of congress members on drought situation, aurangabad, maharashtra | Agrowon

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला पाहता : अशोक चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍यांमधील भूजल पातळीत घट झाली असून, खरीप पिके हातची गेली आहेत. पाणी, चाराटंचाई, मजुरीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री ३१ ऑक्‍टोबरच्या मुहूर्ताची वाट कशाला पाहत आहेत? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शासनाने एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍यांमधील भूजल पातळीत घट झाली असून, खरीप पिके हातची गेली आहेत. पाणी, चाराटंचाई, मजुरीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री ३१ ऑक्‍टोबरच्या मुहूर्ताची वाट कशाला पाहत आहेत? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शासनाने एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भ, खानदेशमधील दुष्काळासंदर्भात काँग्रेसची चिंतन बैठक शनिवारी (ता. १३) औरंगाबाद येथे घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण म्हणाले, की मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळाची मोठी दाहकता आहे. शासनाने मात्र आठपैकी पाच जिल्ह्यांची आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखवून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. शास्त्रीयपद्धतीने केंद्र शासनामार्फत दुष्काळ जाहीर करण्यात येईल, राज्य सरकार ३१ ऑक्‍टोबरला दुष्काळजन्य स्थिती जाहीर करेल, असे मुख्यमंत्री सांगतात. सरकारकडे पैसा नसल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, थकबाकीमुळे वीज तोडण्याची कारवाई थांबविण्यात यावी, कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, बोंड अळीचे अनुदान तातडीने द्यावे, या मागण्यांसाठी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेतला जाणार आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

राज्यात वीजटंचाई निर्माण झाली असून, कोळसा नसल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे महाराष्ट्राचा कोळसा वळविला आहे. तसेच पीक विम्यापोटी शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांनाच मोठा फायदा होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा भरला नसल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

हवामान खाते, कंपन्यांचे साटेलोटे ः विखे पाटील
हवामान खात्याने यंदा १०२ टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांत केवळ ६३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. हवामान खाते व बियाणे उत्पादक कंपन्यांचे साटेलोटे आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...