agriculture news in marathi, meeting for crop loan distribution, nagar, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी काढू : जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी पीककर्ज आवश्‍यक आहे. त्यामुळे बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या बॅंकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडील शासकीय ठेवी काढण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिला.

नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी पीककर्ज आवश्‍यक आहे. त्यामुळे बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या बॅंकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडील शासकीय ठेवी काढण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सर्व बॅंकांच्या खरीप कर्ज वितरणाचा गुरुवारी (ता. २१) आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी तुकाराम गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गवळी यांच्यासह विविध बॅंकांचे जिल्हा व्यवस्थापक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्दिवेदी म्हणाले, की बॅंकांनी त्यांच्या शाखेमध्ये कॅम्प आयोजित करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्ज वितरणात एका आठवड्यात सुधारणा करा. कर्जवितरण ही बाब गंभीरपणे घ्या, शेतकऱ्यांचे कर्ज मागणी प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नका. वेळेवर आणि तत्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या.

१ एप्रिल ते ३१ मेपर्यंत आणि त्यानंतर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज वितरित केले याची माहिती जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी जाणून घेतली. अपवाद वगळता बहुतांश बॅंकांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबत वेगाने कार्यवाही केलेली नाही. बॅंका कार्यवाही करतात की नाही, हे जिल्हा अग्रणी बॅंक अधिकाऱ्यांनी बॅंकांना अचानक भेटी देऊन तपासावे. आढावा बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बॅंक प्रतिनिधींना कारणे दाखवा नोटीस बजवा, असे त्यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...