agriculture news in marathi, meeting for crop loan distribution, satara, maharashtra | Agrowon

कर्जवाटप न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

सातारा : शेतकऱ्यांना अर्थिक अडचण भासू नये यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्वरित पिक कर्ज वाटप करावे. ज्या बॅंका कर्ज वितरण करणार नाहीत अशा बॅंकांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिला.

राज्यात अनेक ठिकाणी बॅंकाकडून पीक कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बॅंक प्रतिनिधींची शुक्रवारी (ता.१५) बैठक आयोजित केली होती. बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांचे प्रतिनिधी हजर होते.

सातारा : शेतकऱ्यांना अर्थिक अडचण भासू नये यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्वरित पिक कर्ज वाटप करावे. ज्या बॅंका कर्ज वितरण करणार नाहीत अशा बॅंकांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिला.

राज्यात अनेक ठिकाणी बॅंकाकडून पीक कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बॅंक प्रतिनिधींची शुक्रवारी (ता.१५) बैठक आयोजित केली होती. बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांचे प्रतिनिधी हजर होते.

जिल्ह्यात आजपर्यंत ५० टक्के पीककर्ज वितरण झाले आहे. या वितरणात २१ राष्ट्रीयीकृत बॅंकांनी उद्दीष्टाच्या तुलनेत अवघे १५ तर खासगी बॅंकांनी उद्दीष्टाच्या तुलनेत आठ टक्के कर्ज वितरण केले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

बैठकीत जिल्हाधिकारी सिंघल यांनी खरीप पिक कर्ज उद्दिष्ट असलेल्या बॅंकांना पुढील दहा दिवसांत शाखानिहाय मेळावे आयोजित करा. या मेळाव्याच्या ठिकाणाची माहिती द्या, मेळाव्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सातबारा उतारा उपलब्ध व्हावा यासाठी तलाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या दहा दिवसांत कोणत्या बॅंकांनी किती कर्ज वाटप केले यांची आकडेवारी पुढील बैठकीत तपासली जाणार आहे. यामध्ये ज्या बॅंकांच्या कर्जवाटपात सुधारणा दिसून येणार नाही अशा बॅंकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच बैठकीस ज्या बॅंकांचे प्रतिनिधी अनुपस्थित आहेत अशा बॅंकांना खुलासा मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ७२४ कोटी २४ लाख म्हणजेच उद्दिष्टाच्या ८९ टक्के पीककर्ज वितरण केले आहे. यामुळे या बॅंकेचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी अभिनंदन केले. तसेच इतर बॅंकांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेप्रमाणे कर्जवाटप करावे असे आदेश त्यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...