agriculture news in marathi, Meeting for the perishable Vegetable and Fruits in Solapur tomorrow | Agrowon

नाशवंत भाजीपाला, फळे उपाययोजना समितीची उद्या बैठक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सोलापूर : राज्य शासनाने स्थापन केलेल्या नाशवंत भाजीपाला व फळे उपाययोजना समितीची रविवारी (ता.19) सोलापुरात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा मंत्री देशमुख या वेळी घेतील. तसेच समितीसमोर उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासंदर्भातही या वेळी चर्चा होणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य अंकुश पडवळे यांनी बुधवारी (ता.15) येथे पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर : राज्य शासनाने स्थापन केलेल्या नाशवंत भाजीपाला व फळे उपाययोजना समितीची रविवारी (ता.19) सोलापुरात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा मंत्री देशमुख या वेळी घेतील. तसेच समितीसमोर उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासंदर्भातही या वेळी चर्चा होणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य अंकुश पडवळे यांनी बुधवारी (ता.15) येथे पत्रकार परिषदेत दिली.

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये रविवारी सकाळी दहा वाजता ही बैठक होईल. पणनमंत्री देशमुख यांनी नाशवंत फळे व भाजीपाला यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाला योग्य त्या शिफारशी व्हाव्यात, यासाठी ही समिती स्थापली आहे. राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी प्रतिनिधी विलास शिंदे (नाशिक), प्रभाकर चांदणे, अंकुश पडवळे (सोलापूर), श्रीराम गाढवे, सोपान कांचन (पुणे) श्रीधर ठाकरे (नागपूर) यांचा समावेश केला आहे.

गेल्या काही महिन्यांत समितीच्या चार बैठका झाल्या आहेत. राज्यातील विविध भागांत जाऊन थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून ही समिती आपली निरीक्षणे नोंदवत आहे, शेतकऱ्यांच्या सूचना ऐकत आहे. आता सोलापुरातील ही शेवटची बैठक असणार आहे. या बैठकीत स्वतः मंत्री देशमुख सहभागी होत आहेत. त्यांच्या सूचना, शेतकऱ्यांच्या सूचना या सगळ्यांबाबत यामध्ये सविस्तर चर्चा होईल. त्याशिवाय आतापर्यंतच्या कामकाजाचाही ते आढावा घेतील, असेही पडवळे यांनी सांगितले. या बैठकीला निमंत्रित शंभर शेतकऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या वेळी तुकाराम मेटकरी, जयराम आलदर, नंदकुमार वरे आदी उपस्थित होते.

२५ ते ३० टक्के शेतमालाची नासाडी
राज्यात सात लाख ४२ हजार हेक्‍टरवर फळे व ६ लाख ९२ हजार हेक्‍टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यात फळाचे उत्पादन १०८ मेट्रिक टन तर भाजीपाल्याचे उत्पादन १०५ लाख मेट्रिक टनापर्यंत इतके आहे. मात्र नाशवंत शेतमालाची शास्त्रोक्त काढणी, काढणी पश्‍चात हाताळणी, विक्री व्यवस्थेचा अभाव, मध्यस्थांची मोठी साखळी, यासारख्या अडचणीमुळे २५ ते ३० टक्के मालाची नासाडी होते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. या मुद्यांवर ही समिती काम करत आहे, असेही पडवळे म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संत्र्याची झाडे पिवळी पडल्याने...अकोला : मृग बहराने दगा दिल्याने संत्रा उत्पादक...
अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकारबँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे...
सीड प्लॉटधारकांनाही बोंड अळीचा फटकाअकोला : कापूस उत्पादनासोबतच सीड प्लॉट...
नागपूर जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र आठ...नागपूर  :  पेंच प्रकल्पामुळे उद्‌भवलेला...
सोलापूरात २४०८ क्विंटल उडीद, मूग,...सोलापूर  : नाफेडच्या वतीने सोलापूर कृषी...
परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे... परभणी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या...
मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय...अमेरिकेतील इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये झालेल्या...