भागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा
गोपाल हागे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले.

अकोला : सातत्याने नफ्यात राहणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांनी केलेल्या विविध प्रश्नांच्या सरबत्तीने गाजली. बियाण्याचे दर, गेल्या हंगामातील हरभरा बियाणे वाटप घोटाळा, कर्मचारी पतसंस्थेतील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे स्पायरल सेपरेटर वाटप, अभ्यास दौरे अशा विविध मुद्यांवर शेतकरी भागधारकांनी महाबीज प्रशासनावर थेट ताशेरे अोढले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ४) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात अायोजित करण्यात अाली होती. यावेळी राज्याचे कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह, खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, डॉ. अनिता चोरे, व्यवस्थापकीय संचालक अोमप्रकाश देशमुख, अामदार रणधीर सावरकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीलाच महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव विजयकुमार हे अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच शेतकरी सभासदांनी गोंधळ घालणे सुरू केले. अध्यक्षच नसल्याने या सभेला काही अर्थ नसल्याचे सांगत बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवत सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. बराच काळ हा गोंधळ सुरू होता.

थोड्या वेळाने वातावरण निवळले.
त्यानंतर सभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले. महाबीज कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतील घोटाळा गेली अनेक महिने गाजत अाहे. महाबीजमध्ये नोकरीला असलेल्या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बडतर्फीची कारवाई का होत नाही, असा प्रश्ना उपस्थित करण्यात अाला.

गेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वाटलेल्या हरभऱ्याचे प्रकरण वर्षभरापासून गाजत अाहे. कृषी केंद्रधारक शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन प्रतिज्ञापत्र भरून मागत अाहेत. कृषी विभागाने केलेल्या चौकशीत महाबीजने अधिक प्रमाणात देयक सादर केल्याचे समोर अाले अाहे. असे असताना कारवाई का केली जात नाही, असे भागधारकांनी विचारले.

सध्या बीज प्रमाणीकरण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करीत अाहे. भ्रष्टाचार बोकाळला असून कंपनी ॲक्टनुसार कामकाज चालत नसल्याचा ठपका एका भागधारकाने केला. कंपनी कायद्यानुसार दोन टक्के सीएसअार खर्च होणे गरजेचा असताना गेल्या तीन वर्षातील एक कोटी ९३ लाख रुपये तसेच पडून असल्याची बाब या शेतकऱ्याने सभागृहाच्या निदर्शनास अाणून दिली.

महाबीजच्या पुढाकाराने होणारे भागधारकांचे दौरेसुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतले जातात. काही विशिष्ट लोकांना लाभ दिला जात असल्याचा अारोपही करण्यात अाला. बुलडाणा जिल्ह्यातील रामेश्वर पाटील नावाच्या भागधारक शेतकऱ्याने तर मागील हंगामात मध्य प्रदेशात सोयाबीन बियाणे बाजारदरापेक्षा अधिक खरेदी केल्याचा अारोप करीत यात लाखाेंचा घोळ असल्याचे सांगतिले.

सभेची वेळ चुकीची
एका भागधारकाने अाजच्या या सभेची वेळच चुकीची असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम, रब्बीची तयारी सुरू झालेली असताना सभा घेणे अयोग्य असल्याचे हा शेतकरी म्हणाला. शिवाय ज्या सभागृहात सभा घेतली जात होती त्यामध्ये कुणाचेच बोलणे कुणाला समजत नव्हते. सभागृहात समोरील लोकांना तेवढे एेकायला येत होते. मागे बसलेल्यांमध्ये सारखा गोंधळ सुरू होता.

कारवाई करणार ः सिंह
अकोला जिल्ह्यात गाजत असलेल्या हरभरा बियाणे वाटप घोळ प्रकरणाचा अहवाल कालच प्राप्त झाला अाहे. त्यानुसार दोषींविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल, असे यावेळी कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह म्हणाले.

 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...