agriculture news in marathi, Meetings for cotton growers at Jalna, Dharangaon | Agrowon

जालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे ः कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, कापसाला अधिक किंमत कशी मिळवू शकतो, याबाबत मार्गदर्शनासाठी उद्या (ता. १) जालना आणि २ ऑगस्ट रोजी धरणगाव येथे कॉटनगुरू व एम. सी. एक्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

पुणे ः कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, कापसाला अधिक किंमत कशी मिळवू शकतो, याबाबत मार्गदर्शनासाठी उद्या (ता. १) जालना आणि २ ऑगस्ट रोजी धरणगाव येथे कॉटनगुरू व एम. सी. एक्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने महाराष्ट्रात आणि इतर राज्यात थैमान घातले. त्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. कॉटनगुरूने या वर्षी देखील गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता आधीच वर्तवलेली होती, जी खरी ठरली आहे. त्यावर कसे नियंत्रण आणि उपाय करता येतील यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी लक्ष्मी कॉटस्पिन लि. गट क्रमांक ३९९, सामणगाव-कजला रोड, मीनाताई ठाकरे वृद्धाश्रमासमोर, जालना येथे मेळावा होणार अाहे, तर २ ऑगस्ट रोजी श्रीजी जिंनिग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी, गट क्रमांक ४६३, जळगाव रोड, धरणगाव, जि. जळगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मेळाव्यांची वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ असून, कार्यक्रमानंतर  उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे.

कॉटनगुरू मनीष डागा हे कापसाच्या मार्केटिंगवर मार्गदर्शन करतील,  अमृतराव देशमुख हे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण आणि उपाय यावर मार्गदर्शन करतील.
एम. सी. एक्स. बद्रृद्दीन खान हे कापसाच्या भविष्यातील किमतीवर मार्गदर्शन करतील, श्री जी जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी आणि लक्ष्मी कॉटस्पिन लिमिटेड हे खरीदाराच्या काय अपेक्षा ज्या पूर्ण झाल्यावर ते कापसाला जादाचे भाव देऊ शकतील यावर मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती कॉटनगुरू मनीष डागा यांनी केली आहे.

इतर बातम्या
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
परभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
पेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली :  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
पुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे  : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...