agriculture news in marathi, Meetings from Monday through Easy Debt Campaign | Agrowon

सुलभ कर्जवाटप अभियानांतर्गत सोमवारपासून मेळावे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांनी संबंधित तालुक्यामध्ये बँकांच्या मदतीने मंडळनिहाय पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

त्याअनुषंगाने सोमवार (ता. १८) पासून ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडल स्तरावर सुलभ पीक कर्ज वाटप अभियान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांनी संबंधित तालुक्यामध्ये बँकांच्या मदतीने मंडळनिहाय पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.

त्याअनुषंगाने सोमवार (ता. १८) पासून ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडल स्तरावर सुलभ पीक कर्ज वाटप अभियान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पीक कर्ज वाटपात अडचण येऊ नये आणि बँक, प्रशासनाच्या परस्पर सहकार्याने कर्ज वाटप प्रक्रिया जलद, सुकर होण्यासाठी राज्य शासनाकडून सुलभ पीक कर्ज वाटप अभियान राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आहेत किंवा मागणी करूनही कर्ज उपलब्ध होत नाही. त्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत सर्व बँकाच्या प्रतिनिधींना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी जलदगतीने पीक कर्ज वाटप करण्याबाबत श्री. डोंगरे यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना दिल्या आहेत.

तालुकानिहाय मंडळ स्तर सुलभ कर्जवाटप मेळाव्याचा कालावधी
सोमवार १८ ते २९ जून ः नांदेड, किनवट, हदगाव
सोमवार १८ ते २५ जून ः मुदखेड, नायगाव, देगलूर, लोहा, बिलोली
सोमवार १८ ते २७ जून  ः धर्माबाद
सोमवार १८ ते ३० जून ः कंधार, मुखेड
सोमवार १८ ते २० जून ः माहूर, उमरी
सोमवार १८ ते २२ जून ः अर्धापूर, हिमायतनगर, भोकर

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...