agriculture news in marathi, Meetings soon with the Chief Minister to help sugar factories | Agrowon

साखर कारखानदारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

सोलापूर : साखरेच्या घसरलेल्या दरामुळे कारखानदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यातही अडचण झाली आहे, या स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच या संदर्भात चर्चेसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सोलापूर : साखरेच्या घसरलेल्या दरामुळे कारखानदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यातही अडचण झाली आहे, या स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच या संदर्भात चर्चेसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सहकारमंत्री देशमुख यांनी "सकाळ'' कार्यालयास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, "साखरेचे दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणे शक्‍य नाही, याबाबत केंद्र सरकारकडे साखर निर्यात करण्याबाबतची शिफारस केली जाणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिनाअखेरीस बैठक होणार आहे.

राज्यात सध्या विजेची उपलब्धता झाली आहे. स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे पूर्वी सहा रुपये प्रतियुनिट होणारे विजेबाबतचे करार आता होत नाहीत. विजेच्या युनिटचे दर कमी झाल्यामुळे साखर कारखानदारांकडून काही दिवसांपूर्वी जादा दर देऊन वीज खरेदीबाबत आता महावितरण सकारात्मक दिसत नाही. विजेची उपलब्धता झाल्याने दर कमी झाले आहेत, त्यामुळेच आता साखर कारखानदारांबरोबरचे करार थांबले आहेत.''

सहकारी संस्थांच्या सुनावण्या घेण्याचे अधिकार यापूर्वी सहकारमंत्र्यांना होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अविश्‍वास निर्माण झाला होता. सत्ताधारी पक्षाचे मंत्री विरोधी पक्षांच्या संस्थांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित निर्णय घेतात, असा आरोप केला जात होता. त्यामुळे संस्थांच्या संदर्भातील सुनावणीचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

इतर बातम्या
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
लाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...