agriculture news in marathi, Mekunu to gearup in Arabia Sea | Agrowon

‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजता तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याजवळच्या ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही वादळी प्रणाली भारतापासून दूर असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर व लक्षद्वीप बेटांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’ चक्रीवादळाने बुधवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजता तीव्र रूप धारण केले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंत हे वादळ अतितीव्र होणार असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याजवळच्या ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही वादळी प्रणाली भारतापासून दूर असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर व लक्षद्वीप बेटांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी सकाळी नैऋत्य अरबी समुद्रात असलेले वादळ ताशी १२ किलोमीटर वेगाने ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. सकाळी साडेआठ वाजता हे वादळ सोकोट्रा बेटापासून २७० किलोमीटर अग्नेयेकडे, तर ओमानच्या सलालाहपासून ६७० किलोमीटर दक्षिणकडे समुद्रात थैमान घालत होते. गुरुवारी सकाळपर्यंत त्याचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार आहे. या वेळी वारे ताशी १५० ते १६० किलोमीटर वेगाने फिरणार असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने झोत वाहणार अाहेत. शनिवारी हे वादळ सलालाहजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाने अरबी समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने येमनच्या किनाऱ्यालगत दाट ढग गोळा झाले आहेत. गुरुवारी अरबी समुद्रातही १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे अंतर्गत अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सून लवकरच अंदमानात
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) प्रगतीस पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या ७२ तासांमध्ये माॅन्सून दक्षिण अंदमानात दाखल होणार अाहे. तर, माॅन्सूनचे आगमन होताच अंदमानात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत वेगवान वारे वाहणार आहे. साेमवारपासून (ता.२८) केरळसह पश्‍चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता अाहे. मासेमारीसाठी किनाऱ्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
दुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...
मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे  : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...
तेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...
दूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...
कर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...
राज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...
बायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दीजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील...
खर्च कमी करणारी आंतरपीक पद्धतीपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात...
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...