agriculture news in marathi, MEP on onion should be removed demands traders and farmers | Agrowon

कांद्यावरील ‘एमईपी'ने निर्यातीत खोडा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नाशिक : किमान निर्यात मूल्य हटविल्यानंतर गतवर्षी ३५ लाख टनांपर्यंत निर्यात झाली आहे. त्यानंतर लादलेली ८५० डॉलर ही कांदा निर्यातीत अडथळा ठरत आहे. बाजारभाव आणि एमईपी यांत सद्यःस्थितीत मोठी तफावत आहे. देशांतर्गत गरजेपेक्षा यंदाही अधिक उत्पादन येण्याचे संकेत आहेत. गुजरात, राजस्थान राज्यातील आवक सुरू झाली आहे. या स्थितीत कांद्यावरील ‘किमान निर्यात मूल्य’ (एमईपी)चे बंधन तातडीने हटवावे, अशीच मागणी या क्षेत्रातून होत आहे.

नाशिक : किमान निर्यात मूल्य हटविल्यानंतर गतवर्षी ३५ लाख टनांपर्यंत निर्यात झाली आहे. त्यानंतर लादलेली ८५० डॉलर ही कांदा निर्यातीत अडथळा ठरत आहे. बाजारभाव आणि एमईपी यांत सद्यःस्थितीत मोठी तफावत आहे. देशांतर्गत गरजेपेक्षा यंदाही अधिक उत्पादन येण्याचे संकेत आहेत. गुजरात, राजस्थान राज्यातील आवक सुरू झाली आहे. या स्थितीत कांद्यावरील ‘किमान निर्यात मूल्य’ (एमईपी)चे बंधन तातडीने हटवावे, अशीच मागणी या क्षेत्रातून होत आहे.

देशातील कांदा शेती यंदा नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडली. खरीप व लेट खरीप कांद्याचे अतोनात नुकसान झाले. उत्पादनात निम्म्याने घट झाली. याच काळात तुटवडा निर्माण झाल्याने मागणी व दरात वाढ झाली. तब्बल दोन वर्षे तोट्यात कांदा विकल्यानंतर कांदा उत्पादकांना ऑक्‍टोबर महिन्यापासून खर्च निघेल असे दर मिळू लागले. या स्थितीत यंदा उन्हाळ कांद्याची मोठी लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यात हा कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. राजस्थान व गुजरात राज्यातील उन्हाळ कांदाही बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम येत्या काळात कांदा बाजारावर होईल. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. ‘एमईपी’ वाढवूनही दरात फरक पडला नाही. येत्या काळात मात्र आवक वाढणार आहे. देशांतर्गत गरज जास्तीत जास्त १५० लाख टनांची असताना यंदाही त्यापेक्षा अधिक उत्पादन होईल अशी स्थिती आहे. या स्थितीत केंद्राने सध्याची ८५० डॉलरची एमईपी तातडीने हटवावी, अशी मागणी होत आहे. 

    वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरेंना पत्र 
     शेतमाल बाजाराचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी कांद्यावरील ‘एमईपी’ पूर्णपणे हटवावी, या मागणीचे पत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना दिले आहे. ते म्हणाले, की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला ३००० रुपये क्विंटलचा दर मिळत असताना आपल्या ८५० डॉलर ‘एमईपी’ दराने कांद्याचा दर ५००० रुपयांचा पडत आहे. या दराने कांदा विक्री होणे अशक्‍य बाब ठरत आहे. यंदाही कांद्याचे विक्रमी उत्पादन होण्याची स्थिती आहे. या स्थितीत कांद्यावरील निर्यातीची बंधने पूर्णपणे काढून टाकावीत. सद्यःस्थितीत ‘एमईपी’ काढून टाकणे हेच सरकार व शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२० पर्यंत दुप्पट करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. कांद्याला चांगले दर मिळाले तरच हे शक्‍य आहे. ते दर मिळण्यात अडथळा आणून ते साध्य होणार नाही. खरीप व लेट खरीप कांद्याचे उत्पादन निम्म्याने कमी झाले आहे. जोरदार पावसाचा मोठा फटका या पिकाला बसला. उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढल्याची माहिती आहे. सध्याची ‘एमईपी’ पूर्णपणे हटवणे गरजेचे आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

शेतमालाच्या आयातीवर कोणतेच बंधन नाही. मग, निर्यातीवरच बंधने का? कांदा हे भाजीपाला वर्गातील पीक आहे. इतर भाज्यांच्या निर्यातीवर बंधने नाहीत. कांद्यावरील बंधन अनाठायी आहे. ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. कांदा उत्पादक अनेक वर्षांपासून तोट्यात शेती करीत आहेत. या शेतीला सरकार हमीभाव देऊ शकत नाही. मात्र, किमान त्याच्यावरील बंधने तरी हटवली पाहिजेत. कांद्यावरील ‘एमईपी’ सरकारने पूर्णपणे काढावी.
- चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक - नाफेड

इतर अॅग्रो विशेष
बॅंकांतील घोटाळ्याने पतशिस्त बिघडत नाही...शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पतशिस्त बिघडते असा...
दूध करपतेय, लक्ष कोण देणार?गेल्या वर्षात तूर, सोयाबीन, कापूस या मुख्य शेती...
राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवरपुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा...
अादेशाअभावी तूर खरेदी बंदचअकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद...
उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर...कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी...
तापमानाचा पारा चाळीशीपारपुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून,...
नागरी सेवा मंडळ बनले दात नसलेला वाघपुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
ध्यास गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाचा...जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर)...
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढलीपुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली...
तंत्रज्ञान एकाधिकाराचे दुष्परिणाम...नागपूर : तंत्रज्ञानात एकाधिकार वाढल्याचे परिणाम...
‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमानपुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात...
ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं कृषी...पुणे : दैनिक ॲग्रोवन खऱ्या अर्थाने चालतं बोलतं...
धुळ्यात शेतकऱ्याने स्वखर्चाने बांधला...धुळे  ः जमिनी विक्री व इतर व्यवसाय सांभाळून...
बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला...सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, दशपर्णी अर्क,...