मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे मिळणार

मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे मिळणार
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे मिळणार

सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी, यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

महावितरणने ऑगस्ट २०१६ पासून मोबाईल अॅपद्वारे मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रीडिंग तात्काळ तपासता यावे, म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस पाठविण्यात येईल. यात सकाळी ८ ते १०, १० ते १२, दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ या दरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.

 रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडिंग घेतले जात आहे, अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे. या उपक्रमाची प्राथमिकस्तरावर नागपूर, कल्याण, मुंबई या भागांत प्रायोगिकस्तरावर चाचणी घेण्यात येत आहे. आता त्याची अंमलबजावणी सगळीकडे करण्यात येणार आहे.

ज्या ग्राहकांनी अद्याप आपला मोबाईल क्रमांक नोंदवला नाही, त्यांनी तातडीने क्रमांक नोंदवून महावितरणच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com