agriculture news in marathi, MGL's first GIS sub-center has been implemented in Hingoli | Agrowon

हिंगोलीत महावितरणचे पहिले जीआयएस उपकेंद्र कार्यान्वित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

हिंगोली ः नांदेड परिमंडळअंतर्गत हिंगोली मंडळ कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेतून उभारण्यात आलेले महावितरण कंपनीचे राज्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड प्रणाली (जीआयएस) उपकेंद्र केंद्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे चार हजार वीजग्राहकांना अंखड तसेच योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली ः नांदेड परिमंडळअंतर्गत हिंगोली मंडळ कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेतून उभारण्यात आलेले महावितरण कंपनीचे राज्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड प्रणाली (जीआयएस) उपकेंद्र केंद्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे चार हजार वीजग्राहकांना अंखड तसेच योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

या गॅस इन्सुलेटेड प्रणाली (जीआयएस) वीज उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ मे २०१७ रोजी केले होते. खाकीबाबा मठ उपकेंद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपकेंद्रातून नवीन आठ ११ केव्ही वीजवाहिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे. अखंडित, योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यास या उपकेंद्राची मदत होणार आहे.

लिंबाळा येथील २२० किव्हो या अतिउच्च दाब विद्युत केंद्राद्वारे खाकीबाबा मठ उपकेंद्रास ३३ किव्हो दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे मार्गदर्शन तर तत्कालीन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे या उपकेंद्राचे काम गतीने करता आले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...