agriculture news in marathi, Is the Mhasal scheme only for name? | Agrowon

म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत लाभ क्षेत्र असलेल्या मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्‍यांत दुष्काळाची छाया गडद होत आहे. वास्तविक पाहता ही योजना सुरू असली तरी परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्याची मागणी करून देखील पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत लाभ क्षेत्र असलेल्या मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्‍यांत दुष्काळाची छाया गडद होत आहे. वास्तविक पाहता ही योजना सुरू असली तरी परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्याची मागणी करून देखील पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

म्हैसाळ योजनेचे आवर्तन खरीप हंगामात सुरू केले असते, तर भूजल पातळी स्थिर राहिली असती. खरीप वाया गेल्यानंतर सध्या ही योजना सुरू झाली आहे. योजना सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरीही अजून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी दिसत नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मिरज तालुक्‍यातून कवठेमहांकाळ तालुक्‍यात गेल्या आठवड्यात पोचले आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातून हे पाणी जत तालुक्‍यात सोडण्यात आले आहे.

दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे. द्राक्ष बागांच्या छाटण्या रखडल्या आहेत. ज्या फळ छाटण्या झाल्या आहेत, त्यांना पाणी नाही. त्यामुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडावे, अशी मागमी दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र अद्यापही या योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आलेले नाही. दुष्काळी पट्ट्यातील भागातील शेतकरी द्राक्ष, डाळिंब पिकाला टॅंकरने पाणी देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही मुख्य कालव्यातून वाहताना दिसते आहे. पोटकालव्यातून पाणी शेतीच्या शिवारात गेलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडू लागली आहेत. शेतमजुरांचा प्रश्नही गंभीर बनणार आहे.

पैसे संकलन, भरणा नाहीच
म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकरी पैसे भरत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे पैसेही देत आहेत. मात्र वसूल झालेली पाणीपट्टी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी भरणाच केला नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तर अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता, हा भाग आमच्या विभागात येत नाही, अशी धक्कादायक उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...