agriculture news in marathi, Mhaysal, Water Resources Institute to start the development | Agrowon

म्हैसाळ, ताकारीसाठी सुरू करणार पाणीवाटप संस्था
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या ९१, तर ताकारी उपसा सिंचन योजनेच्या ७२ पाणीवाटप संस्था सुरू होणार आहेत. मात्र, अद्यापही या पाणीवाटप संस्थांचे कामकाज सुरू नसल्याचे चित्र आहे. यामुळे पाणीवाटप संस्था कधी सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या ९१, तर ताकारी उपसा सिंचन योजनेच्या ७२ पाणीवाटप संस्था सुरू होणार आहेत. मात्र, अद्यापही या पाणीवाटप संस्थांचे कामकाज सुरू नसल्याचे चित्र आहे. यामुळे पाणीवाटप संस्था कधी सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव हे तालुके समाविष्ट आहेत. या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ८० हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र आहे. तासगाव तालुक्‍यातील तीन हजार हेक्‍टरला याचा फायदा होतोय. शासनाने उपसा सिंचन योजनेवर पाणीवाटप संस्था सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली पाटबंधारे विभागाने मार्च २०१८ मध्ये नियोजन सुरू केले. त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असली तरी, अद्यापही पाटबंधारे विभागाने त्यासाठी हालचाली सुरू केलेल्या दिसत नाहीत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अडचणीत आली आहे. वेळेत पाणीपट्टी वसुली होत नाही. कर्मचारी संख्या कमी अशा विविध योजना सुरळीत चालण्यासाठीच्या नियोजनात अडचणी निर्माण होत आहेत. दरवर्षी थकबाकीत वाढ होते आहे. पाणीपट्टी वसूली वेळेत होत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी वापर संस्था सुरू स्थापन झाल्या तर पाणीपट्टी वसुली वेळेत होईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळेल. परंतु पाणी वाटप संस्था स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने पाणीवाटप संस्था कधी सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

ताकारी उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र २७ हजार ४३० हेक्‍टर असून त्यापैकी १५ हजार हेक्‍टर ओलिताखाली आले आहे. या योजनेची पाणीपट्टी वेळेत वसूल होत असली तरी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी पाणीवाटप संस्था सुरू केल्या जाणार आहेत.

याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, ते म्हणाले, ‘पाणीवाटप संस्था स्थापन करण्याचे काम हाती घेतले आहे. मतदार यादी तयार झाली आहे. ज्या ठिकाणी पाणीवाटप संस्था सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणाचा नकाशादेखील तयार केला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत पाणीवाटप संस्था सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे. सुरवातीच्या टप्प्यात मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्‍यात पाणीवाटप संस्था सुरू होतील. ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रात पुढील महिनाअखेर पाणीवाटप संस्था सुरू होतील. यामुळे पाणीवाटपाचे नियोजन काटेकोरपणे होईल. तसेच पाणीपट्टीची वसुली वेळेत होणार आहे. यामुळे आवर्तन वेळेत सुरू करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...