agriculture news in marathi, micro drip irrigation scheme status, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील ८३३५ हेक्‍टर क्षेत्र आले सूक्ष्म सिंचनाखाली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018
सांगली  ः पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार २३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, १९ कोटी ८१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ८३३५ हेक्‍टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली  ः पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार २३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, १९ कोटी ८१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ८३३५ हेक्‍टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
शासनाने सिंचन योजनेत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी निधीची तरतूद केली आहे. एकूण निधीच्या ६० टक्के हिस्सा हा केंद्र तर ४० टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे.  कृषी विभागाने शेतकऱ्यापर्यंत ही योजना सक्षमपणे पोहोचवली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील १५ हजार २३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
 
यात तासगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कडेगाव, जत, मिरज, आटपाडी या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनीदेखील या योजनेचा लाभ घेतला आहे. मुळात जत, आटपाडी, आणि तासगाव तालुक्‍यात सातत्याने पाणीटंचाई भासते. त्यामुळे या भागातील शेतकरी सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य देत आहेत. त्यातच द्राक्ष, डाळिंब ही पिके याच भागात आहेत. त्यामुळे या पिकांना सूक्ष्म सिंचन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या योजनेत या तालुक्‍यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसून येते. 
 
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ५५, तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना मिळणारे विविध योजनांचे अनुदान आता थेट बॅंकेच्या खात्यावर जमा होत आहे. सूक्ष्म सिंचन संचाची तपासणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी योजनेतील अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...